सोनमला आवडते \सुंदर दिसणे
By Admin | Updated: November 18, 2016 04:49 IST2016-11-18T04:49:43+5:302016-11-18T04:49:43+5:30
‘बॉ लिवूडची मस्सकली गर्ल’ सोनम कपूर हिचेच बघा, तिलाही सुंदर दिसायलाआवडतं.

सोनमला आवडते \सुंदर दिसणे
‘बॉ लिवूडची मस्सकली गर्ल’ सोनम कपूर हिचेच बघा, तिलाही सुंदर दिसायलाआवडतं. ‘फॅशनिस्टा’ सोनम कपूर बॉलिवूडमध्ये एक हरहुन्नरी कलाकार म्हणून ओळखली जाते. सौंदर्याची सोनमची स्वत:ची एक व्याख्या आहे. ती म्हणते, ‘बी टाऊनमध्ये मी फॅशन आयकॉन म्हणून नव्हे तर एक कलाकार म्हणून वावरते. स्वत:ला आवडेल असे तयार होणे हेच माझ्यासाठी सुंदर दिसणे आहे. दुसऱ्यांसाठी मी कधीच चांगले दिसण्याचा प्रयत्न करत नाही. मला फॅशनेबल कपडे घालायला आवडतात. फॅशनचा अर्थ चित्रविचित्र कपडे घालणे असा नव्हे. तर ज्या कपड्यांत आपल्याला कम्फर्टेबल वाटते, ती म्हणजे फॅशन. आपण सुंदर दिसत असलो की, आपला आत्मविश्वास वाढतो.