सोनम कपूर लवकरच उरकणार साखरपुडा?
By Admin | Updated: May 10, 2017 11:55 IST2017-05-10T10:00:00+5:302017-05-10T11:55:32+5:30
बॉलिवूडची मस्सकली गर्ल सोनम कपूर सध्या आपल्या लव्ह लाइफमुळे चांगलीच चर्चेत आहे.

सोनम कपूर लवकरच उरकणार साखरपुडा?
tyle="text-align: justify;">ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 10 - बॉलिवूडची मस्सकली गर्ल सोनम कपूर सध्या आपल्या लव्ह लाइफमुळे चांगलीच चर्चेत आहे. सोमन कपूर आणि तिचा कथित बॉयफ्रेंड आनंद आहुजा यांच्या प्रेमाच्या चर्चा बॉलिवूडमध्ये होत आहेत. माध्यमांच्या वृत्तानुसार हे दोन्ही लव्हबर्ड लवकरच साखरपुडा करणार आहेत. सोनम कपूर आणि आनंद यांना अनेक पार्टी आणि कार्यक्रमात एकत्र पाहण्यात आले आहे.
गेल्या वर्षी सोनम कपूर ने सोशल मीडिया अकाऊंटवर बोटात अंगठी असलेला फोटो शेअर केला होता, त्यावरून तिने बॉयफ्रेंड आनंद आहुजासोबत साखरपुडा केल्याच्या बातम्यांना उधाण आले होते. निरजाच्या यशानंतर दोन्ही लव्हबर्ड अॅमस्टरडॅम येथे सुट्टीवर गेले होते. सोनम कपूर आणि तिचा बिझनेसमन बॉयफ्रेंड आनंद आहुजा हे 2017 मध्ये लग्नाच्या बंधनात अडकणार असल्याच्या चर्चा बी टाऊनमध्ये आहेत.
सोनम कपूरचा आगामी चित्रपट वीरें दी वेडिंगची अर्धी शूटिंग झाली आहे. मध्यंतरी, अनिल कपूर यांच्या लंडन येथील बर्थडे पार्टीत सोनम आहुजासोबत आली होती. तेव्हापासूनच ते दोघे लवकरच लग्न करणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे.