Sonam Kapoor Pregnant: दुसऱ्यांदा आई होणार सोनम कपूर? 'वायू'च्या जन्मानंतर कुटुंबात पुन्हा चिमुकल्या पाहुण्याची चाहुल
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2025 10:52 IST2025-10-01T10:50:49+5:302025-10-01T10:52:02+5:30
सोनम कपूर लवकरच शेअर करणार गुडन्यूज?

Sonam Kapoor Pregnant: दुसऱ्यांदा आई होणार सोनम कपूर? 'वायू'च्या जन्मानंतर कुटुंबात पुन्हा चिमुकल्या पाहुण्याची चाहुल
गेल्या काही महिन्यात बॉलिवूडमधील अनेक अभिनेत्रींनी गुडन्यूज दिली आहे. नुकतंच कतरिना कैफने पोस्ट शेअर करत प्रेग्नंसीची अधिकृत घोषणा केली. या महिन्यात ती बाळाला जन्म देणार आहे. तर काही महिन्यांपूर्वी कियारा अडवाणीने लेकीला जन्म दिला. आता सोनम कपूर दुसऱ्यांदा प्रेग्नंट असल्याची माहिती समोर आली आहे. लवकरच सोनम आणि पती आनंद आहुजा ही गुडन्यूज चाहत्यांसोबत शेअर करणार आहेत. यासोबत अनिल कपूर पुन्हा एकदा आजोबा होणार आहेत.
सोनम कपूर आणि बिझनेसमन आनंद आहुजा यांनी २०१८ मध्ये लग्नगाठ बांधली. तर २०२२ मध्ये सोनमने मुलाला जन्म दिला. त्याचं नाव वायू असं ठेवण्यात आलं. वायू आता तीन वर्षांचा झाला आहे. दरम्यान 'पिंकव्हिला'च्या रिपोर्टनुसार, सोनम कपूर पुन्हा गरोदर आहे. सध्या ती प्रेग्नंसीच्या दुसऱ्या ट्रायमिस्टरमध्ये आहे. या गुडन्यूजमुळे कपूर कुटुंबात आनंदाचं वातावरण आहे. लवकरच सोनम आणि आनंद ही गुडन्यूज शेअर करणार आहेत. त्यामुळे अद्याप कपलकडून अधिकत घोषणा झालेली नाही.
सोनम कपूरने यापूर्वी प्रेग्नंसीवर चर्चा केली होती. 'आई झाल्याने माझ्यात अनेक बदल झाले आहेत. मी आणखी सहनशील झाले आहे. मला सर्व मातांना हेच सांगायचंय की तुम्ही सगळं छान करत आहात, स्वत:ला वेळ द्या आणि प्रत्येक क्षणाचा आनंद घ्या. चुका होतच असतात प्रत्येक जण हुशार नसतो. वर्तमानात जगा, आनंदी राहा."