सोनालीची दुबई सफर
By Admin | Updated: April 17, 2016 01:21 IST2016-04-17T01:21:39+5:302016-04-17T01:21:39+5:30
अमेरिका, आॅस्ट्रेलिया, जपान, इंग्लंडपाठोपाठ दुबई या उच्चभ्रू शहराची सफर करावी, असे प्रत्येकाचे स्वप्न असते. आणि हेच स्वप्न पूर्ण झाले ते आपली अप्सरा म्हणजेच अभिनेत्री

सोनालीची दुबई सफर
अमेरिका, आॅस्ट्रेलिया, जपान, इंग्लंडपाठोपाठ दुबई या उच्चभ्रू शहराची सफर करावी, असे प्रत्येकाचे स्वप्न असते. आणि हेच स्वप्न पूर्ण झाले ते आपली अप्सरा म्हणजेच अभिनेत्री सोनाली कुलकर्णीचे. सध्या सोनाली कुलकर्णी दुबईची मनसोक्त सफर एन्जॉय करताना दिसत आहे. दुबईच्या वाळवंटात तिने काही फनी फोटो सेशनदेखील केलेले आहे. आश्चर्य म्हणजे, नेहमी समुद्रात किवा कोणत्याही पाण्याच्या ठिकाणी पोहोचलो की, टायटॅनिक पोझ दिल्याशिवाय कोणताही फोटो कम्प्लिट होत नाही. असाच एक जबरदस्त फोटो या सुंदर अभिनेत्रीने भर वाळवंटात उंटावरची सैर करताना क्लिक केला आहे. तसेच, या फोटोमध्ये तिने उंटावर बसून वाळवंटात टायटॅनिक पोझ दिली आहे. तिचे हे फनी फोटो सेशन नक्कीच तिच्या चाहत्यांच्या पसंतीस उतरेल. तर, दुसऱ्या फोटोमध्ये आठवणी कैद करताना या अप्सरेने वाळवंटाच्या ठिकाणी होणाऱ्या सनसेटचे खास क्षण सेल्फीमध्ये क्लिक केले आहेत.
चला तर मराठी इंडस्ट्रीची ही गॉजस अप्सरा उतरली दुबईच्या भूतलावर...