सोनालीचे बॉलीवूडमध्ये पुनरागमन
By Admin | Updated: October 5, 2016 02:57 IST2016-10-05T02:57:40+5:302016-10-05T02:57:40+5:30
सोनाली कुलकर्णीने हिंदी आणि मराठी दोन्ही चित्रपटसृष्टीत आपल्या अभिनयाची मोहोर उमटविली आहे. सध्या मराठी चित्रपट आणि नाटकांमध्ये व्यस्त असलेली सोनाली लवकरच हिंदी चित्रपट करणार

सोनालीचे बॉलीवूडमध्ये पुनरागमन
सोनाली कुलकर्णीने हिंदी आणि मराठी दोन्ही चित्रपटसृष्टीत आपल्या अभिनयाची मोहोर उमटविली आहे. सध्या मराठी चित्रपट आणि नाटकांमध्ये व्यस्त असलेली सोनाली लवकरच हिंदी चित्रपट करणार असल्याचे कळतेय. सोनाली बॉलिवूडमध्ये पुनरागमन करीत असल्याच्या चर्चा सध्या इंडस्ट्रीमध्ये रंगू लागल्या आहेत. आता ती कोणत्या चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पुन्हा पुनरागमन करते हे अद्याप कळू शकलेले नाही. आतापर्यंत 'दिल चाहता है', 'मिशन कश्मीर', 'दिल विल प्यार व्यार', 'डरना जरूरी है' आणि 'टॅक्सी नंबर ९२११' या हिंदी चित्रपटांतील सोनालीने केलेल्या भूमिका विशेष उल्लेखनीय ठरल्या आहेत. आजही सोनालीच्या अनेक हिंदी चित्रपटांतील भूमिकांचे कौतुक केले जाते. तर मराठीतही 'डॉ. प्रकाश बाबा आमटे' या चित्रपटातील तिने साकारलेल्या भूमिकेसाठी तिला अनेक पुरस्कारदेखील मिळाले आहेत.