सोनाली फॅन नं. 1

By Admin | Updated: August 29, 2016 03:59 IST2016-08-29T03:59:11+5:302016-08-29T03:59:11+5:30

कलाकारांचे चाहते तर अनेक असतात; परंतु एखादा कलाकार दुसऱ्या कलाकाराचा फॅन आहे, असे तुम्हाला सांगितले, तर थोडे नवल वाटेल ना

Sonali fan no. 1 | सोनाली फॅन नं. 1

सोनाली फॅन नं. 1

कलाकारांचे चाहते तर अनेक असतात; परंतु एखादा कलाकार दुसऱ्या कलाकाराचा फॅन आहे, असे तुम्हाला सांगितले, तर थोडे नवल वाटेल ना! काही कलाकार खुल्या मनाने आपल्या सहकलाकाराच्या अभिनयाचे कौतुक करतात. आपण एखाद्या कलाकाराचे फॅन असल्याचे सांगतात. सोनाली कुलकर्णीने मराठी चित्रपटसृष्टीप्रमाणेच बॉलीवूडमध्येदेखील आपले प्रस्थ निर्माण केले आहे. तिच्या अभिनयाचे अनेक चाहते आहेत. सोनालीचे अनेक फॅन असले, तरी ती स्वत: ‘कॉमेडी क्वीन’ निर्मिती सावंतची मोठी फॅन आहे. सोनालीने नुकताच ट्विटरवर निर्मिती सावंत आणि प्रसाद ओक यांच्यासोबतचा एक फोटो अपलोड केला आहे. या फोटोसोबत तिने ‘मै निर्मिती सावंत की जबरदस्त फॅन हूँ!’ असे
लिहिले आहे आणि एवढेच
नाही, तर निर्मितीच्या ड्रेसिंग स्टाईलवरही सोनाली फिदा असल्याचे तिने या ट्विटमध्ये सांगितले आहे. निर्मितीने अनेक चित्रपटांमध्ये विनोदी भूमिका साकारल्या आहेत. तिच्या विनोदी शैलीचे कौतुक नेहमीच केले जाते. निर्मितीचे अनेक चाहते आहेत. या चाहत्यांमध्ये आता सोनालीचीदेखील भर पडली आहे, असेच म्हणावे लागेल.

Web Title: Sonali fan no. 1

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.