म्हणून...सलमानने केला पाक कलाकारांना सपोर्ट
By Admin | Updated: October 2, 2016 15:15 IST2016-10-02T15:15:24+5:302016-10-02T15:15:24+5:30
अभिनेता सलमान खानने पाकिस्तानी कलाकारांचे समर्थन केले खरे पण त्याच्या या पवित्र्यामागील उद्देश काय? असा प्रश्न प्रत्येकाला पडला असेल

म्हणून...सलमानने केला पाक कलाकारांना सपोर्ट
ऑनलाइन लोकमत
मुंबई,दि. २ : 'पाकिस्तानी कलाकार म्हणजे काही दहशतवादी नाहीत, त्यामुळे त्यांना भारतात काम करण्यास बंदी घालणं योग्य नाही' अशा शब्दांत अभिनेता सलमान खानने पाकिस्तानी कलाकारांचे समर्थन केले खरे पण त्याच्या या पवित्र्यामागील उद्देश काय? असा प्रश्न प्रत्येकाला पडला असेल. पाक कलाकारांच्या समर्थनार्थ सल्लू उभा राहीला त्यामागे खरं तर त्याचं आर्थिक गणित असू शकतं असा अंदाज चित्रपट वर्तुळात वर्तवण्यात येत आहे.
पाकमध्ये सलमान खानच्या चित्रपटाची कमाई स्थानिक चित्रपटापेक्षा अधिक असल्याचे समोर आले आहे. त्याची ही कमाई कोट्यावधी रुपयांच्या घरात आहे. सलमान खानचा नुकताच प्रदर्शित झालेल्या सुलतान चित्रपटाने पाकमध्ये १२ कोटी रुपयांचा गल्ला जमवला होता. तर बजरंगी भाईजान ६० लाख, किक १० कोटी आणि दबगं ३८ लाख रुपये. दबगं सलमानचे चित्रपट पाकिस्तानमध्ये तिकिटबारीवर हिट ठरलेत. त्यामुळं पाकिस्तानातून होणाऱ्या कमाईवर पाणी सोडावं लागू नये म्हणून सलमाननं पाकिस्तानी कलाकारांना पाठिंबा दर्शवल्याची चर्चा सुरु आहे.
दरम्यानन, भारतीय लष्कराने पाकव्याप्त काश्मीरमध्ये 'सर्जिकल स्ट्राईक' करत ३८ दहशतवाद्यांना कंठस्नान घातल्यानंतर संपूर्ण देशात अभिमानाचे वातावरण असून 'उरी' हल्ल्याचा योग्य बदला घेतल्याची भावनाही व्यक्त होत आहे. ' इम्पा'नेही यापुढे पाक कलाकारांना भूमिका न देण्याचा निर्णय घेतला आहे