...म्हणून हृतिक-सूझान पुन्हा एकत्र येणे अशक्य
By Admin | Updated: February 9, 2017 13:54 IST2017-02-09T13:54:46+5:302017-02-09T13:54:46+5:30
पती-पत्नीचे नाते संपुष्टात आल्यानंतर अभिनेता हृतिक रोशन आणि सूझान खान ब-याच ठिकाणी एकत्र दिसले. त्यांनी भरपूर वेळ सोबत घालवला.

...म्हणून हृतिक-सूझान पुन्हा एकत्र येणे अशक्य
tyle="text-align: justify;">ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 9 - पती-पत्नीचे नाते संपुष्टात आल्यानंतर अभिनेता हृतिक रोशन आणि सूझान खान ब-याच ठिकाणी एकत्र दिसले. त्यांनी भरपूर वेळ सोबत घालवला. चित्रपट पाहण्यापासून ते डिनरपर्यंत दोघांचे एकत्र फोटो माध्यमांनी टिपले. मागच्यावर्षी नाताळच्या सुट्ट्यांमध्येही दोघे एकत्र कौटुंबिक सहलीला गेले होते.
त्यामुळे हे दोघे एकत्र येणार अशी चर्चा सुरु आहे. दोघांमधल्या वाढत्या जवळीकीवर जेव्हा माध्यमांनी हृतिकला प्रश्न विचारला तेव्हा त्याने पुन्हा एकत्र संसार थाटण्याची शक्यता फेटाळून लावली.
सूझान आणि मी आम्ही दोघे आजही मित्र आहोत. आम्हाला दोघांनाही परस्परांबद्दल प्रेम, काळजी वाटते. पण बस इतकच. त्यापुढे काही नाही असे हृतिकने स्पष्ट केले. हृतिक-सूझानचा घटस्फोट झाल्यानंतर त्यांच्या नात्यांचा मुलांवर परिणाम होऊ नये. हे सुद्धा दोघांच्या एकत्र येण्यामागचे एक कारण आहे.