मोठ्या पडद्यावर ‘कुशल’ अभिनयाची झलक!
By Admin | Updated: May 31, 2017 05:12 IST2017-05-31T05:12:36+5:302017-05-31T05:12:36+5:30
कॉमेडीचं अचूक टायमिंग आणि भन्नाट परफॉर्मन्स यामुळे कुशल बद्रिके महाराष्ट्राचा लाडका बनला आहे. विविध स्कीटच्या माध्यमातून

मोठ्या पडद्यावर ‘कुशल’ अभिनयाची झलक!
कॉमेडीचं अचूक टायमिंग आणि भन्नाट परफॉर्मन्स यामुळे कुशल बद्रिके महाराष्ट्राचा लाडका बनला आहे. विविध स्कीटच्या माध्यमातून कुशल असा काही परफॉर्मन्स देतो की रसिकांसोबत सेलिब्रिटीही त्याच्यावर फिदा झालेत. छोट्या पडद्यावरील विविध कॉमेडी शो, मालिकासोबतच त्याने सिनेमातही काम केलं आहे. आता सा-यांचा लाडका असणा-या कुशलचं रसिकांना पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर दर्शन होणार आहे. एका नव्या सिनेमाच्या शुटिंगमध्ये कुशल सध्या बिझी झाला आहे. खुद्द कुशलनंच ही गुडन्यूज रसिकांना दिली आहे. सोशल मीडियावर पोस्ट टाकून आपल्या नव्या आणि आगामी सिनेमाची बातमी त्याने रसिकांसोबत शेअर केली आहे. या सिनेमाच्या शुटिंग दरम्यानचा खास फोटोही कुशलने सोशल मीडियावर शेअर केला आहे. या फोटोमध्ये कुशलचा आगळा वेगळा अंदाज पाहायला मिळत आहे. स्कीटमध्ये गावरान भूमिका कुशलनं मोठ्या खुबीनं साकारल्या आहेत. आता या सिनेमातही कुशलचा गावरान अंदाज रसिकांना पाहायला मिळणार आहे. गावरान लूकमधला फोटो त्यानं आपल्या फॅन्ससोबत शेअर केला आहे. तुमच्या शुभेच्छा सदैव सोबत असू द्या अशी कॅप्शनही कुशलने या फोटोला दिली आहे. कुशलनं आपल्या या नव्या सिनेमाची ही गुडन्यूज सोशल मीडियावर शेअर करताच रसिकांकडूनही त्याला प्रतिसाद मिळू लागला आहे.