छोट्या पडद्यावर परतणार सिझान

By Admin | Updated: June 17, 2016 01:27 IST2016-06-17T01:27:21+5:302016-06-17T01:27:21+5:30

कसोटी जिंदगी की या मालिकेतील अनुराग बासूची भूमिका साकारणाऱ्या सिझान खानच्या चाहत्यांसाठी खूप चांगली बातमी आहे. तो छोट्या पडद्यावर परत येणार असल्याची चर्चा आहे.

Sishan to return to the small screen | छोट्या पडद्यावर परतणार सिझान

छोट्या पडद्यावर परतणार सिझान

कसोटी जिंदगी की या मालिकेतील अनुराग बासूची भूमिका साकारणाऱ्या सिझान खानच्या चाहत्यांसाठी खूप चांगली बातमी आहे. तो छोट्या पडद्यावर परत येणार असल्याची चर्चा आहे. सिझान गेल्या कित्येक वर्षांपासून मालिकेपासून दूर आहे. सिझान ‘ये है मोहोब्बते’ या मालिकेत काम करणार होता. पण ऐनवेळी त्याने ही मालिका सोडली. पण आता ‘गंगा’ या मालिकेत तो झळकणार असल्याचे म्हटले जात आहे. या चित्रपटात सिझान एक महत्त्वाची भूमिका साकारणार आहे. तो एका व्यवसायिकाच्या
भूमिकेत दिसणार आहे. सिझानच्या एन्ट्रीमुळे गंगाच्या आयुष्याला वेगवेगळी वळणे मिळणार असल्याची चर्चा आहे.

Web Title: Sishan to return to the small screen