दोन चित्रपटांसाठी एकच स्टोरी
By Admin | Updated: July 10, 2015 22:10 IST2015-07-10T22:10:08+5:302015-07-10T22:10:08+5:30
फिल्म इंडस्ट्रीमध्ये वाङ्मयचौर्य होणे हे काय नवीन नाही. पण, इथे तर चक्क एकाच लेखकाने दोन चित्रपटांसाठी एकच स्टोरी दिली आहे.

दोन चित्रपटांसाठी एकच स्टोरी
फिल्म इंडस्ट्रीमध्ये वाङ्मयचौर्य होणे हे काय नवीन नाही. पण, इथे तर चक्क एकाच लेखकाने दोन चित्रपटांसाठी एकच स्टोरी दिली आहे. ‘मराठी टायगर्स’ आणि २४ जुलैला रिलीज होणाऱ्या ‘कॅरी आॅन मराठा’ या चित्रपटांमध्ये सध्या हा वाद सुरू असल्याचे समजते. तसा हा वाद एका वर्षापासून भारतीय चित्रपट महामंडळाकडे आहे; पण आता कॅरी आॅन मराठाचे प्रदर्शन जवळ येत असताना पुन्हा एकदा या वादाला तोंड फुटले आहे. याबद्दल कॅरी आॅन मराठाचे कथालेखक संजय लोंढे सांगतात, मुख्यत: या दोन्ही चित्रपटांची स्क्रिप्ट पूर्णत: वेगळी आहे आणि त्याबद्दल महामंडळाने क्लीन चिटही दिली होती. तसेच, मराठी टायगर्सला महामंडळाने ३० जूनपर्यंत चित्रपट प्रदर्शनाची मुदत दिली होती.