'सिंगर ऑफ द मिलेनियम मोहम्मद रफी यांची आज पुण्यतिथी

By Admin | Updated: July 31, 2016 12:16 IST2016-07-31T12:16:55+5:302016-07-31T12:16:55+5:30

'कभी खुद पें कभी हालात पें रोना आया' अशा अनेक अजरामर गाण्यांमध्ये पडद्यावर दिसला तो चेहरा देव आनंदचा आणि आवाज होता मोहम्मद रफींचा.

Singer of the Millennium Mohammad Rafi, today's death anniversary | 'सिंगर ऑफ द मिलेनियम मोहम्मद रफी यांची आज पुण्यतिथी

'सिंगर ऑफ द मिलेनियम मोहम्मद रफी यांची आज पुण्यतिथी

style="text-align: justify;">संजीव वेलणकर 
पुणे, दि. ३१ - 'दिन ढल जायें हाय रात न जायें', 'तेरे मेरे सपने अब एक रंग है', 'कभी खुद पें कभी हालात पें रोना आया' अशा अनेक अजरामर गाण्यांमध्ये पडद्यावर दिसला तो चेहरा देव आनंदचा आणि आवाज होता मोहम्मद रफींचा. शास्त्रिय संगिताची तालिम त्यांनी उस्ताद बडे गुलाम अली खाँ, उस्ताद अब्दुल वाहिद खान, पंडित जीवनलाल मट्टो आणि फिरोज निजामी यांच्याकडे घेतली. रफीजींचा पहिला पब्लिक परफॉर्मन्स हा त्याच्या वयाच्या १३ व्या वर्षी लाहोर मध्ये झाला. 
पहिले गाणे  'गाँव की गोरी' या चित्रपटात त्यांनी १९४५ मध्ये गायले. त्याच दरम्यान गायना बरोबरच त्यांनी एक दोन चित्रपटात छोट्या छोट्या भुमिकाही केल्या. १९४७ मध्ये फाळणीनंतर रफीजींनी भारतात राहण्याचा निर्णय घेतला. १९४९ ते १९७० च्या दरम्यान रफीजींनी चित्रपटक्षेत्रात आपल्या जबरदस्त गायनाने चांगला जम बसवला व तो टिकवला देखील. १९६० चं दशक हे रफीजींसाठी खास होतं, त्याच वर्षी त्यांना 'चौदहवी का चाँद' च्या शिर्षकगीतासाठी पहिल्यांदाच फिल्मफेअर अवॉर्ड मिळालं. 
याच दशकात रफीजींनी दिग्गज संगीतकारांबरोबर काम करून अनेकानेक हिट गाणी दिली. या काळात किशोरकुमार स्वतःच्या गाण्यापेक्षा अभिनयाकडे जास्त लक्ष द्यायचे. त्यामुळे त्यांना गायला कठिण जातील अशी 'मन मोरा बावरा' (चित्रपट - रागिनी) आणि 'अजब है दास्तां तेरी ये जिंदगी' ही दोन गाणी त्या त्या संगितकारांनी चक्क रफीजींकडून गाऊन घेतली होती. १९६९-७० मध्ये आराधनातली 'मेरे सपनोंकी रानी ' आणि 'रूप तेरा मस्ताना ' गाजल्यावर सुपरस्टार राजेशखन्ना नेहमी किशोरकुमारजीचीच शिफारस जिथे तिथे करू लागला. 
त्यामुळे रफीसाठी गायनाच्या संधी कमी होत गेल्या. अगदीच कव्वाली, शास्त्रीय, गजल.. अशा प्रकारची संगिताची बैठक असलेली गाणी त्यांना मिळू लागली. पण त्यातूनही 'हम किसीसे कम नही' मधल्या 'क्या हुवा तेरा वादा' या गाण्याने रफीजींना पुन्हा एकदा नव्याने प्रकाशझोतात आणलं. हा आनंद फार काळ टिकला नाही कारण त्याकाळी चित्रपटक्षेत्रात खूप वेगाने बदल होत होते. त्यातही मोहम्मद रफी यांनी लक्ष्मीकांत-प्यारेलाय यांच्या मदतीने 'कर्ज' साठी 'दर्द्-ए-दिल' गात नविन प्रवाहात स्वत:ला झोकून दिलं खरं, पण सिनेमातून आता 'संगीत' हद्दपार होतंय हे त्यांना पुर्णपणे कळून चुकलं होतं. लता मंगेशकर व मोहम्मद रफी यांच्या छोट्या छोट्या वादांचं आणि मतभेदांचं पर्यावसान एकमेकांबरोबर न गाण्याच्या निर्णयात रूपांतरीत झालं. 
'दिल ने फिर याद किया' या चित्रपटाचं शिर्षकगीत गाण्यासाठी सोनिक ओमी यांना रफी, लता आणि मुकेश यांची निवड केली होती. पण नेमकं त्याचवेळी 'लता आणि रफी हे एकमेकांबरोबर गाणार नाहीत' असं दोघांनी जाहीर करून टाकलं. सुमन कल्याणपूर या नव्या तरूण गायिकेला ते गाणं दिलं. त्यांनी एकवेळ लताजींना वगळल, पण रफीजी मात्र त्या गाण्यात त्यांना जास्त महत्त्वाचे वाटले. वैयक्तिक पातळीवर मात्र त्याचे वाद कधीच मिटले नाहीत. रफीजी हे त्यांच्या उदार स्वभावासाठी प्रसिद्ध होते. किशोरकुमारजींच्या सिनेमातल्या गाण्यासाठी त्यांनी निव्वळ 'एक रुपया' मानधन घेतलं असही म्ह्टलं जातं. 
शम्मीसाठी त्यांनी ज्या धाटणीत गाणी गायली आहेत, ती गाणी कुणीही पडद्यावर न पाहता फक्त ऐकून सांगेल किंवा अंदाज बांधू शकेल की ही गाणी बहुतेक शम्मीवरच चित्रित झाली असतील असं ऐकिवात आहे की गाण्याच्या रेकॉर्डिंगच्या वेळेला शम्मी स्वतः स्टुडिओत रफीजींना भेटून सांगत असे की ह्या गाण्यावर मी असे हावभाव करणार आहे किंवा इथे थोडा अंगविक्षेप आहे. इ. 'दोस्ती' चित्रपटासाठी त्यांनी सुधीरकुमार या नवोदित कलाकारासाठी ३ ते ४ गाणी गायली. तिही त्याच्याच लकबीत. त्यापैकी 'चाहूंगा मैं तुझे... ' या गीताला फिल्मफेअर मिळाले. 
आपल्या एकूण ३५ वर्षांच्या गायनाच्या कारकिर्दीत त्यांनी ४००० च्या वर गाणी गायली. ज्यात हिंदी, मराठीसह अन्य भाषेतल्या अनेक प्रकारच्या गाण्यांचा समावेश होता. गैरफिल्मी, गझल, भजन, क्लासिकल, सेमिक्लासिकल इ. या अनेक प्रकारांमध्ये रफीजींचे अनेक मूडही समाविष्ट आहेत. रफींना गाडय़ांचीही खूप आवड होती. या छंदापोटी त्यांनी थेट लंडनहून होंडा कार मागविली होती आणि ऑडी हे नाव सिनेमासृष्टीत फारसं कोणाला ठाऊक नव्हतं तेव्हा त्यांच्या दारात दिमाखात ऑडी उभी होती. त्यांना करमणूकीसाठी कॅरम, बॅडमिंटन व पत्ते खेळायला आवडत. तसंच पतंग उडवणे हा ही त्यांचा छंद होता.*मा.मोहम्मद रफी* यांचे ३१ जुलै १९८० रोजी निधन झाले. आपल्या समुहा तर्फे मा.मोहम्मद रफी यांना आदरांजली. 
 
मोहम्मद रफी यांनी गायलेली काही गाणी
तुम मुझे यूं भुला ना पाओगे
तु है मेरा प्रेम देवता
चौदहवी का चांद हो 
कोई प्यार के देखे जादुगिरी
हम और तुम
मेरे मेहबूब तुझे
धीरे धीरे चल चांद गगन मे
रंग और नूर कि 
एक शहेनशाह ने बनवाके हसी ताजमहाल
अभी ना जाओ छोडकर 
मन रे तू काहे ना धीर धरे 
गुलाबी आखें जो तेरी देखी

Web Title: Singer of the Millennium Mohammad Rafi, today's death anniversary

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.