सिद्धार्थ म्हणतोय, ‘आलो उडत’
By Admin | Updated: August 31, 2016 01:52 IST2016-08-31T01:52:00+5:302016-08-31T01:52:00+5:30
कलाकार सध्या सोशल साइट्सवर बारीकसारीक गोष्टी अपलोड करू लागले आहेत. या माध्यमातून त्यांना सहजपणे त्यांच्या चाहत्यांपर्यंत पोहोचता येते.

सिद्धार्थ म्हणतोय, ‘आलो उडत’
कलाकार सध्या सोशल साइट्सवर बारीकसारीक गोष्टी अपलोड करू लागले आहेत. या माध्यमातून त्यांना सहजपणे त्यांच्या चाहत्यांपर्यंत पोहोचता येते. अनेक कलाकार आपल्या चाहत्यांच्या संपर्कात राहाण्यासाठी याचा वापर करत आहेत.
आपल्या विनोदीशैलीमुळे ओळखला जाणारा सिद्धार्थ जाधव सध्या ‘गेला उडत’ या नाटकाच्या प्रयोगामध्ये व्यग्र आहे. त्याच्या या नाटकाचे अनेक शहरांमध्ये दौरे सुरू आहेत, पण तरीही वेळ काढून सिद्धार्थ सोशल मीडियावर नेहमीच काही ना काही तरी अपलोड करत असतो. त्याचे फोटो किंवा त्याच्या आयुष्यातील सुंदर क्षण, काही बातम्या तो नेहमीच सोशल मीडियावर त्याच्या चाहत्यांसाठी शेअर करतो. नुकताच सिद्धार्थ त्याच्या नाटकाच्या प्रयोगासाठी नागपूरला गेला होता. त्याने मुंबईहून नागपूरला जाताना ‘गेलो उडत’ असे ट्विट केले होते. आता तो मुंबईला परतला असून, त्याने एक झक्कास फोटो ट्विटरवर अपलोड करत ‘बॅक टू मुंबई... आलो उडत...’ असे ट्विट केले आहे.