सिद्धार्थ, कतरिनाचं 'काला चष्मा' गाणं रिलीज
By Admin | Updated: July 27, 2016 12:51 IST2016-07-27T12:46:56+5:302016-07-27T12:51:50+5:30
अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा आणि कतरिना कैफच्या आगामी चित्रपट 'बार बार देखो'चं पहिलं गाण रिलीज करण्यात आलं आहे

सिद्धार्थ, कतरिनाचं 'काला चष्मा' गाणं रिलीज
>ऑनलाइन लोकमत -
मुंबई, दि. 27 - अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा आणि कतरिना कैफच्या आगामी चित्रपट 'बार बार देखो'चं पहिलं गाण रिलीज करण्यात आलं आहे. गेले काही दिवस चित्रपटातील 'काला चष्मा' गाण्याचं जोरदार प्रमोशन करण्यात येत होतं. बुधवारी हे गाणं रिलीज करण्यात आलं. दिग्दर्शक आणि निर्माता करण जोहरने ट्विटर अकाऊंटवरुन या गाण्याचा व्हिडिओ शेअर केला आहे. करण जोहर या चित्रपटाचा सह-निर्माता आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन नित्या मेहराने केलं आहे. नित्या मेहराचा हा पहिलाच चित्रपट आहे.
रॅपर बादशाहने ‘काला चष्मा’ गाण्यास संगीतबद्ध केले असून १९९० साली प्रदर्शित झालेल्या ‘तेनु काला चष्मा जजता वे’ या सुप्रसिद्ध पंजाबी गाण्याचा हा रिमेक आहे. अमर आर्शी, बादशाह आणि नेहा कक्कर यांनी हे गाणं गायलं आहे. बॉस्को-सिझर यांनी कोरिओग्राफी केली आहे. कतरिनाचा गाण्यातील हटके लूक चर्चेचा विषय बनला आहे. सोबतच सिद्धार्थ आणि कतरिना प्रथमच एकत्र काम करत असल्याने त्यांची केमिस्ट्रीची चाहत्यांमध्ये चर्चा होत आहे.
Here it is...the party starter of the year... https://t.co/sTkZWA6Qw3#KalaChashma@S1dharthM#katrina— Karan Johar (@karanjohar) July 27, 2016
'या चित्रपटात प्रेमी जोडप्याचा 40 वर्षांचा प्रवास दाखवण्यात येणार आहे. ही एक काल्पनिक कथा असून एका व्यक्तीच्या आयुष्यातील 18 वर्षापासून ते 60 वर्षापर्यंतचा प्रवास दाखवण्यात येणार आहे. सिद्धार्थ मल्होत्राचा 'कपूर अॅण्ड सन्स' शेवटचा चित्रपट आला होता. तर कतरिना कैफ 'फितूर ' चित्रपटात शेवटची दिसली होती. सध्या ती रणबीर कपूरसोबत 'जग्गा जासूस' चित्रपटाचं शूटिंगदेखील करत आहे.