सिया साकारतेय सोज्वळ भूमिका
By Admin | Updated: September 1, 2016 02:20 IST2016-09-01T02:20:09+5:302016-09-01T02:20:09+5:30
आपल्याला नेहमीच हॉट अंदाजात पाहायला मिळणारी अभिनेत्री सिया पाटील आता प्रेक्षकांसमोर एकदम वेगळ्या भूमिकेत झळकणार आहे.

सिया साकारतेय सोज्वळ भूमिका
आपल्याला नेहमीच हॉट अंदाजात पाहायला मिळणारी अभिनेत्री सिया पाटील आता प्रेक्षकांसमोर एकदम वेगळ्या भूमिकेत झळकणार आहे. ‘फक्त तुझ्याचसाठी’ या चित्रपटात ती सोज्वळ भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटातील सियाच्या भूमिकेकडे तिच्या चाहत्यांचे लक्ष लागले आहे. या चित्रपटात प्रेक्षकांना एक लव्ह ट्रँगल पाहायला मिळणार आहे. यश कपूर आणि लीना बोकेफोडे हे कलाकारदेखील या चित्रपटात आहेत. सियाने यामध्ये एका सोज्वळ पत्नीची भूमिका साकारली असून यश तिच्या पतीच्या भूमिकेत प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. जबरदस्त अॅक्शन आणि रोमान्स आपल्याला फक्त तुझ्याचसाठी या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. अंकिता तारे, नफे खान, विलास उजवणे, अंजली उजवणे, हेतल राठोड, देवदास डोंगरे, भावना करीके, अंजू धर आदी कलाकार या चित्रपटात महत्त्वाची भूमिका साकारत आहेत. पार्श्व मोशन पिक्चर निर्मित आणि यश फिल्म्स व्हिजन प्रस्तुत या चित्रपटाचे दिग्दर्शन एस. प्यारेलाल आणि जगन्नाथ रंगधोल यांनी केले आहे. चित्रपटाचे निर्माते कनक पटेल, राजेंद्र रावत, मिलिंद पांडे, ओमप्रकाश सिंग, जयेश दंड हे आहेत.