शुभांगी अत्रे बनणार नवी ‘अंगूरी भाभी’

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2016 17:39 IST2016-03-16T13:00:29+5:302016-04-17T17:39:19+5:30

‘भाभी जी घर पर हैं’ या लोकप्रीय शोमधून शिल्पा शिंदे अर्थात ‘अंगूरी भाभी’ने एक्झिट घेतली. तेव्हापासून ‘अंगूरी भाभी’शिवाय मालिका ...

Shubhangi Atre becomes new 'Anguri Bhabhi' | शुभांगी अत्रे बनणार नवी ‘अंगूरी भाभी’

शुभांगी अत्रे बनणार नवी ‘अंगूरी भाभी’

alt="" class="lazy" data-original="https://d3pc1xvrcw35tl.cloudfront.net/images/420x315/cnxoldfiles/Shubhangi_Atre.jpg"/>

‘भाभी जी घर पर हैं’ या लोकप्रीय शोमधून शिल्पा शिंदे अर्थात ‘अंगूरी भाभी’ने एक्झिट घेतली. तेव्हापासून ‘अंगूरी भाभी’शिवाय मालिका पुढे रेटली जात आहे. पण यामुळे मालिकेचा टीआरपी घटला आहे. त्यामुळेच मालिकेच्या निर्मात्यांनी नव्या ‘अंगूरी भाभी’चा शोध सुरु केला होता. मध्यंतरी शीतल खंडाल ही ‘अंगूरी भाभी’च्या भूमिकेत दिसणार अशी चर्चा होती. पण आता शीतल नव्हे तर या भूमिकेसाठी शुभांगी आत्रे हिचे नाव फायनल झाल्याची बातमी आहे. लवकर शुभांगी ‘अंगूरी भाभी’च्या भूमिकेत दिसेल. शुभांगीने यापूर्वी ‘कसौटी जिंदगी की’ आणि ‘कस्तूरी’ या टीच्ही मालिकांमध्ये काम केलेले आहे. शुभांगी ही सहज अभिनय करणारी अभिनेत्री आहे. ‘अंगूरी भाभी’च्या भूमिकेत ती नक्कीच प्रेक्षकांचे मन जिंकेल, असा विश्वास ‘भाभी जी घर पर हैं’च्या निर्मात्यांनी व्यक्त केला आहे. तेव्हा आता बघूयात...
......................................................

‘अंगूरी भाभी’ची पोलिसात तक्रार
‘भाभीजी घर पर हैं’ या मालिकेतून लोकप्रीयतेच्या शिखरावर पोहोचलेली ‘अंगूरी भाभी’ अर्थात शिल्पा शिंदे हिच्यावर आजीवन बंदी लादण्याच्या निर्णयाप्रत पोहोचलेल्या सिने अ‍ॅण्ड टीव्ही आर्टिस्ट असोसिएशनविरूद्ध शिल्पाने  पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. शिवाय ‘भाभीजी घर पर हैं’ या मालिकेची निर्माती बिनेफर कोहली हिच्याविरूद्ध मानसिक छळ केल्याची तक्रारही दाखल केली आहे. ‘भाभीजी घर पर हैं’ अचानक सोडण्याच्या निर्णयामुळे शिल्पावर आजीवन बंदी लादण्याचा निर्णय असोसिएशनने घेतला आहे. याविरूद्ध शिल्पाने आवाज उठवत, हा निर्णय गैर असल्याचे म्हटले आहे. मला काम करण्यापासून रोखण्याचा सिने अ‍ॅण्ड टीव्ही आर्टिस्ट असोसिएशनला काहीही अधिकार नाही, असे तिने म्हटले. आता हा वाद पुढे किती विकोपाला जातो, ते बघूयात!!
.......................................................

‘अंगूरी भाभी ’च्या  करिअरला फूलस्टॉप?
‘अंगूरी भाभी’ अर्थात शिल्पा शिंदे हिच्या चाहत्यांसाठी तूर्तास तरी एक वाईट बातमी आहे. ‘भाभीजी घर पर हैं’मधूल ‘अंगूरी भाभी’ची एक्झिट आधीच अनेकांना चटका लावून गेलीय. कपिल शर्माच्या शोमध्ये ‘अंगूरी भाभी’ दिसणार यामुळे शिल्पाच्या चाहत्यांना आनंद झाला होता. पण त्या आनंदावर विरजण टाकणारी बातमी आहे. ‘अंगूरी भाभी’कदाचित यानंतर कधीही टीव्हीवर दिसणार नाही, अशी ही बातमी आहे. सिने अ‍ॅण्ड टीव्ही आर्टिस्ट असोसिएशन शिल्पावर आजीवन बंदी लादण्याच्या विचारात आहे. ‘भाभीजी घर पर हैं’ची निर्माती बिनफेर कोहली हिने बेजबाबदारपणे मध्येच शो सोडून गेल्याबद्दल शिल्पाविरूद्ध तक्रा केली होती. एका वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसर, सिने अ‍ॅण्ड टीव्ही आर्टिस्ट असोसिएशनने शिल्पाविरूद्ध नॉन-कोआॅपरेशन डायरेक्टिव जारी केले आहे. अशास्थितीत तिच्यासोबत कुण्याही निर्मात्या वा दिग्दर्शकास काम करण्यास बंदी असेल. सिने अ‍ॅण्ड टीव्ही आर्टिस्ट असोसिएशनच्या डिस्प्युट कमिटीचे अध्यक्ष अमित बहल यांनी सांगितले की, आम्ही अनेकदा शिल्पाशी संपर्क करून तिला शो सोडण्यामागचे कारण विचारण्याचा प्रयत्न केला व अखेर तिच्याविरूद्ध कठोर पाऊल उचलण्याचा निर्णय घेतला. शो मध्येच सोडून शिल्पा एक चुकीचा पायंडा पाडू इच्छिते अशास्थितीत निर्मात्यास पाठींबा देण्याशिवाय आमच्याकडे दुसरा कुठलाही पर्याय नाही. यादरम्यान आपली केस फेडरेशन आॅफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉइजने हँडल करावी, अशी शिल्पाची इच्छा आहे. या फेडरेशनने अद्याप यासंदर्भात कुठलाही निर्णय घेतलेला नाही.
..................................................

रश्मी देसाई नाही, ही नटी बनणार ‘अंगुरी भाभी’
‘भाभी जी घर पे है’ या लोकप्रीय मालिकेत ‘अंगूरी भाभी’ अर्थात शिल्पा शिंदे नसल्याने प्रेक्षक अतिशय नाराज आहे. रश्मी देसाई अंगूरी भाभीची जागा घेईल, अशी बातमी मध्यंतरी आली होती. मात्र आता एका वेबसाईटने केलेल्या दाव्यानुसार, शीतल खंडाल ही अभिनेत्री शिल्पा शिंदेची जागा घेणार आहे. शीतलने ‘बालिका वधू’मध्ये गहनाची भूमिका साकारली होती. आता अंगूरी भाभीच्या व्यक्तिरेखेत शितल किती फिट बसते, ते बघावे लागले. निर्मात्यासोबत वाद झाल्याने शिल्पा शिंदेने ‘भाभी जी घर पे है’ला रामराम ठोकला होता. हा शो सोडून ती कपिल शर्माच्या शोमध्ये येणार असल्याची चर्चा आहे. अर्थात याबाबत अधिकृत माहिती मिळालेली नाही.




......................................................................................

​अंगुरी भाभीला कायदेशीर नोटीस
‘भाभीजी घर पे है’ या लोकप्रीय विनोदी मालिकेतील ‘अंगुरी भाभी’ अर्थात शिल्पा शिंदे हिला मालिकेच्या निर्मात्याने कायदेशीर नोटीस बजावले आहे. निर्मात्याकडून मानसिक छळ होत असल्याचा शिल्पाचा आरोप आहे. याचमुळे शिल्पाने ‘भाभीजी घर पे है’ला राम राम ठोकला आहे.  निर्मात्याने मात्र हा आरोप धुडकावून लावत उलट शिल्पावरच कराराचे उल्लंघन करण्याचा प्रतिआरोप ठेवला आहे. शिवाय तिला कायदेशीर नोटीसही बजावले आहे. खुद्द शिल्पानेच ही माहिती दिली. ‘भाभीजी घर पे है’ मालिका करताना अन्य कुठेही काम करता येणार नाही, अशा करारावर प्रॉडक्शन हाऊसने मला स्वाक्षरी करायला सांगितली. या करारास मी नकार दिला तेव्हापासून माझा मानसिक छळ सुरु झाला, असे शिल्पाने सांगितले. तुम्ही कुणालाही अशा करारासाठी बाध्य करू शकत नाही. मी प्रॉडक्शन हाऊससोबत कुठलाही करार केलेला नाही. रश्मी देसाईने अचानक शो सोडल्यामुळे मी या शोमध्ये आले होते. मी सेटवर नखरे दाखवत होते, अशा अफवा आता पसरवल्या जात आहे, असेही ती म्हणाली.

Web Title: Shubhangi Atre becomes new 'Anguri Bhabhi'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.