जैसी करनी वैसी भरनी! श्रेयस तळपदेचा नवा सिनेमा 'करतम भुगतम', ट्रेलर एकदा पाहाच

By ऑनलाइन लोकमत | Published: May 6, 2024 03:40 PM2024-05-06T15:40:22+5:302024-05-06T15:40:55+5:30

'करतम भुगतम' असं श्रेयसच्या नव्या सिनेमाचं नाव असून नुकताच सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे.

shreyas talpade new movie kartam bhugtam trailer film released on 17th may | जैसी करनी वैसी भरनी! श्रेयस तळपदेचा नवा सिनेमा 'करतम भुगतम', ट्रेलर एकदा पाहाच

जैसी करनी वैसी भरनी! श्रेयस तळपदेचा नवा सिनेमा 'करतम भुगतम', ट्रेलर एकदा पाहाच

अभिनेता श्रेयस तळपदेने मराठीबरोबरच हिंदी सिनेसृष्टीही गाजवली. 'अपना सपना मनी मनी', 'हाऊसफुल', 'ओम शांती ओम', 'गोलमाल अगेन', 'इक्बाल', 'कौन प्रविण तांबे?' अशा सिनेमातून त्याच्या अभिनयाच्या छटा पाहायला मिळाल्या. आता श्रेयस नव्या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. 'करतम भुगतम' असं श्रेयसच्या नव्य सिनेमाचं नाव असून नुकताच सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे.

श्रेयसने त्याच्या सोशल मीडियावरुन 'करतम भुगतम' सिनेमाचा ट्रेलर शेअर केला आहे. "फक्त १० दिवसांसाठी न्यूझीलंडहून माझ्या शहरात आलो होतो. पण, एका ज्योतिषाने मला सांगितलं की मी कधीच इथून जाऊ शकत नाही. मी इथे अडकलो आहे. मी कधी परत जाऊ शकेन का? की कधीच नाही", असं श्रेयसने पोस्टमध्ये म्हटलं आहे. या सिनेमात तो देव जोशी हे पात्र साकारताना दिसणार आहे. 

'करतम भुगतम' या सिनेमाच्या ट्रेलरमध्ये देव जोशी हे पात्र साकारणारा श्रेयस परदेशातून भारतात काही कामासाठी परतल्याचं दिसत आहे. पण, १० दिवसांसाठी आलेला देव अडकून पडतो. त्यानंतर यातून बाहेर पडण्यासाठी तो ज्योतिषाची मदत घेत असल्याचं पाहायला ट्रेलरमध्ये पाहायला मिळत आहे. 'करतम भुगतम' सिनेमाचा १.४६ मिनिटांचा ट्रेलर उत्कंठावर्धक आहे. हा सिनेमा १७ मेला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. श्रेयसबरोबर या सिनेमात विजय राझ, मधू यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. 

Web Title: shreyas talpade new movie kartam bhugtam trailer film released on 17th may

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.