'चला हवा येऊ द्या' परत येणार? खुद्द श्रेया बुगडेनेच दिली मोठी हिंट, गौरव मोरेही दिसणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 25, 2025 11:35 IST2025-05-25T11:35:19+5:302025-05-25T11:35:44+5:30
'चला हवा येऊ द्या'च्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे. पुन्हा एकदा 'चला हवा येऊ द्या' सुरू होणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. खुद्द कॉमेडी क्वीन श्रेया बुगडेनेच याबाबत हिंट दिली आहे.

'चला हवा येऊ द्या' परत येणार? खुद्द श्रेया बुगडेनेच दिली मोठी हिंट, गौरव मोरेही दिसणार
झी मराठी वाहिनीवरील 'चला हवा येऊ द्या' हा अतिशय लोकप्रिय कार्यक्रम. तब्बल १० वर्ष प्रेक्षकांचं मनोरंजन केल्यानंतर या कार्यक्रमाने गेल्या वर्षी निरोप घेतला. 'चला हवा येऊ द्या' बंद झाल्याने चाहते नाराज होते. मात्र आता 'चला हवा येऊ द्या'च्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे. पुन्हा एकदा 'चला हवा येऊ द्या' सुरू होणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. खुद्द कॉमेडी क्वीन श्रेया बुगडेनेच याबाबत हिंट दिली आहे.
'चल भावा सिटीत' या कार्यक्रमात श्रेया बुगडेने हजेरी लावली होती. तिच्यासोबत 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम गौरव मोरेदेखील होता. या कार्यक्रमातील एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. यामध्ये श्रेयस तळपदे श्रेया बुगडेला विचारतो "तुझं काम खूप मोठं आहे. महाराष्ट्रभर लोक तुला प्रचंड प्रेम करतात. त्यांना तुला पुन्हा पाहायचं आहे". त्यावर श्रेया बुगडे त्याला म्हणते, "मी सुद्धा प्रेक्षकांना तितकंच मिस करतेय. या स्टेजवर परफॉर्म करणंही तितकंच मिस करतेय. आपल्या सगळ्यांनाच माहितीये की झी मराठी कधीच आपल्याला नाराज करत नाही. त्याच्यामुळे काहीतरी कुजबूज मीदेखील ऐकतेय. प्रेक्षकही उत्सुक आहेत".
श्रेयाच्या या वक्तव्यामुळे झी मराठीवर पुन्हा 'चला हवा येऊ द्या' सुरू होणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. प्रेक्षकही 'चला हवा येऊ द्या'च्या पुढच्या सीझनची प्रतीक्षा करत आहेत. मात्र अद्याप याबाबत कोणतीही ऑफिशियल माहिती मिळालेली नाही. श्रेया आणि गौरव मोरे 'चला हवा येऊ द्या'मधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार की आणखी कोणता नवा कॉमेडी कार्यक्रम घेऊन येणार हे पाहावं लागेल.