'सरकार 3'चं शूटिंग सुरू, पाहा फोटो
By Admin | Updated: October 19, 2016 21:28 IST2016-10-19T21:19:36+5:302016-10-19T21:28:22+5:30
महानायक अमिताभ बच्चन यांनी 'सरकार' चित्रपटाच्या तिस-या सिक्वलचं चित्रीकरण सुरू केलं आहे. राम गोपाल वर्मा यांचा हा

'सरकार 3'चं शूटिंग सुरू, पाहा फोटो
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 19 - महानायक अमिताभ बच्चन यांनी 'सरकार' चित्रपटाच्या तिस-या सिक्वलचं चित्रीकरण सुरू केलं आहे. राम गोपाल वर्मा यांचा हा चित्रपट वैचित्र्यपूर्ण आणि अनपेक्षित आहे असं बीग बी म्हणाले. मंगळवारी रात्री बच्चन यांनी याबाबत ट्विट केलं.
'सरकार 3' मध्ये अमिताभ हे सुभाष नागरेंच्या भूमिकेत दिसणार आहेत. चित्रपटात रोहिणी हट्टंगडी, जॅकी श्रॉफ, मनोज वाजपेयी, रोनित रॉय, भरत दाभोळकर आणि यामी गौतम यांसारखे कलाकार आहेत.
यापुर्वी सरकार चित्रपटाच्या दोन्ही भागांमध्ये अमिताभ मुख्य भूमिकेत होते. सरकार 2005 मध्ये तर सरकार राज 2008 मध्ये प्रदर्शित झाला होता.