‘एन.डी.’त झाली ‘ट्रकभर स्वप्न’ शूट

By Admin | Updated: July 24, 2016 05:02 IST2016-07-24T05:02:30+5:302016-07-24T05:02:30+5:30

नितीन चंद्रकांत देसाई हे नाव चित्रपटसृष्टीत सुवर्णाक्षरांनी लिहिले जावे असेच आहे. याचे कारण, देसाई यांचे चित्रपटांमध्ये दिसणारे भव्य-दिव्य सेट्स त्या सिनेमांना एका वेगळ्या उंचीवर

Shoot 'dream full of truck' in 'N.D.' | ‘एन.डी.’त झाली ‘ट्रकभर स्वप्न’ शूट

‘एन.डी.’त झाली ‘ट्रकभर स्वप्न’ शूट

नितीन चंद्रकांत देसाई हे नाव चित्रपटसृष्टीत सुवर्णाक्षरांनी लिहिले जावे असेच आहे. याचे कारण, देसाई यांचे चित्रपटांमध्ये दिसणारे भव्य-दिव्य सेट्स त्या सिनेमांना एका वेगळ्या उंचीवर घेऊन जातात. डोळे दिपून जातील असे आरस्पानी सौंदर्य त्यांच्या सेट्समध्ये असते. हम दिल दे चुके सनम, देवदास, जोधा-अकबर, प्रेम रतन धन पायो या चित्रपटांमध्ये आपण त्यांच्या सेट्सची जादू अनुभवलीच आहे. देसार्इंचे प्रोडक्शन हाऊसदेखील आहे. आगामी ‘ट्रकभर स्वप्न’ हा सिनेमा देसाई लवकरच आपल्या भेटीला घेऊन येत आहेत. स्मिता तांबे, क्रांती रेडकर, मकरंद देशपांडे, मनोज जोशी यांच्या प्रमुख भूमिका असलेला हा चित्रपट त्यांच्या एन. डी. स्टुडिओत चित्रीत करण्यात आला आहे. अभिनेत्री स्मिता तांबेने ‘सीएनएक्स’ला दिलेल्या खास मुलाखतीमध्ये या गोष्टीचा उलगडा केला. स्मिता म्हणाली, नितीन देसाई यांच्या प्रोडक्शनमध्ये काम करण्याचा अनुभव खूप वेगळा अन् छान होता. आम्ही संपूर्ण फिल्मचे शूटिंग एन.डी. स्टुडिओत केले आहे. जेव्हा आम्ही सेटवर गेलो, तेव्हा तो सेट पाहूनच म्हणालो, आपल्याला नक्कीच काही तरी वेगळे करायला मिळणार आहे. स्टुडिओमध्ये एक झोपडपट्टी तयार करण्यात आली होती अन् तिथेच संपूर्ण सिनेमाचे शूटिंग केले. तुम्ही जेव्हा रिअल लोकेशन्सवर शूटिंगसाठी जाता, तेव्हा फारच कंजेस्टेड वाटते. परंतु या सेटवर छान शूटिंग करता आले आणि सतत एकमेकांसोबत असल्याने आमच्यात खूप छान बाँडिंग झाले. देसाई यांच्या एन.डी.त उभारण्यात आलेल्या सेटवर ‘ट्रकभर स्वप्न’ तर शूट झाली, आता वाट पाहायची ती पडद्यावर पाहायला कधी मिळणार याचीच.

- priyanka.londhe@lokmat.com

Web Title: Shoot 'dream full of truck' in 'N.D.'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.