‘शिवानी सुर्वे’ झळकणार नव्या सिनेमात,जाणून घ्या कशी असणार भूमिका

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 25, 2021 11:39 IST2021-10-25T11:34:08+5:302021-10-25T11:39:28+5:30

अभिनेत्री शिवानी सुर्वे अभिनेता अंकुश चौधरीसोबतच्या ‘ट्रिपल सीट’ सिनेमात ती दिसली. शिवाय २०२० मध्ये तिला चार मानाचे नामांकित पुरस्कार मिळाले.

Shivani Surve All set to start in new Marathi movie Shooting Soon, know Details | ‘शिवानी सुर्वे’ झळकणार नव्या सिनेमात,जाणून घ्या कशी असणार भूमिका

‘शिवानी सुर्वे’ झळकणार नव्या सिनेमात,जाणून घ्या कशी असणार भूमिका

अभिनेत्री शिवानी सुर्वे ही लवकरच नव्या सिनेमात झळकणार आहे. या सिनेमात शिवानीसोबत अजून कोणकोणते कलाकार असतील ही माहिती सध्या गुलदस्त्यात आहे.शिवानी सुर्वे 'देवयानी' या मराठी मालिकेतून  प्रकाशझोतात आली होती. त्यानंतर तिने 'जाना ना दिल से दूर', 'लाल इश्क',' एक दिवाना था' अशा अनेक हिंदी मालिकांमध्ये काम केले आहे.  गेल्या दहा वर्षातल्या यशस्वी टिव्ही कारकिर्दीनंतर ‘बिग बॉस मराठी’ हा रिएलिटी शो तिने केला.बिग बॉस मराठीच्या दुसऱ्या सिझनमध्ये तीने ग्रॅंड फिनालेपर्यंत बाजी मारली होती. तसेच तिला या आधी व्हिएतनाममध्ये तिच्या 'जाना ना दिल से दूर' या हिंदी मालिकेकरीता सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा आंतरराष्ट्रीय पुरस्कार देखील मिळाला होता.

 

शिवाय 'जाना ना दिल से दूर' ही हिंदी मालिका इंडोनेशिया आणि व्हिएतनाममध्ये डब होऊन प्रसारीत झाल्यापासून शिवानीची आंतरराष्ट्रीय पातळीवरही चांगलीच फॅनफोलोविंग वाढली आहे.

२०१६ ला शिवानी ‘घंटा’ सिनेमात झळकली होती. त्यानंतर २०१९ मध्ये अभिनेता अंकुश चौधरीसोबतच्या ‘ट्रिपल सीट’ सिनेमात ती दिसली. शिवाय २०२० मध्ये तिला चार मानाचे नामांकित पुरस्कार मिळाले. त्यात सिटी सिने अवॉडर्समध्ये शिवानीला ‘ट्रिपल सीट’ सिनेमासाठी ‘सर्वोत्कृष्ट डेब्युटंट अभिनेत्री’ पुरस्काराने गौरवण्यात आले. 

अभिनेत्री शिवानी सुर्वे तिच्या नव्या प्रोजेक्टविषयी सांगते, “मी या सिनेमासाठी फारच उत्सुक आहे. जेव्हा मी पहिल्यांदा ही कथा ऐकली. त्यानंतर मी क्षणाचाही विलंब न लावता त्वरीत होकार कळवला. खरंतर या सिनेमातील माझी भूमिका खूपच चॅलेंजींग आहे. आणि मी पहिल्यांदाच माझ्या कम्फर्ट झोनच्या बाहेर जाऊन काहीतरी चॅलेंजींग करणार आहे. सध्या मी सिनेमातील भूमिकेची तयारी करत आहे. तर या सिनेमाच शुटींग लवकरच सुरू होईल.”आता अभिनेत्री शिवानी सुर्वे या सिनेमात कोणत्या भूमिकेत दिसेल हे पाहाणं, तिच्या चाहत्यांसाठी औत्सुक्याचं ठरेल.

Web Title: Shivani Surve All set to start in new Marathi movie Shooting Soon, know Details