बाळंतपणानंतर वाढलेले 21 किलो वजन शिल्पा शेट्टीनं 3 महिन्यांत घटवलं
By Admin | Updated: May 23, 2016 19:30 IST2016-05-23T19:00:09+5:302016-05-23T19:30:25+5:30
बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री शिल्पा शेट्टीनं गर्भधारणेनंतर काळात 3 महिन्यांत तब्बल 21 किलो वजन घटवलं

बाळंतपणानंतर वाढलेले 21 किलो वजन शिल्पा शेट्टीनं 3 महिन्यांत घटवलं
tyle="text-align: justify;">ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 23 - ब-याच महिलांची बाळंतपणानंतर वजन वाढल्याची तक्रार असते. अर्थात बाळंतपण म्हणजे बाईचा एक प्रकारचा पुनर्जन्मच असतो. अनेक महिला बाळंतपणानंतर वाढलेल्या वजनाकडे म्हणजेच फॅटकडे कानाडोळा करतात. मात्र बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री शिल्पा शेट्टीनं गर्भधारणेनंतर 3 महिन्यांत तब्बल 21 किलो वजन घटवलं आहे.
याबाबत सेलिब्रिटींचे फिटनेस एक्सपर्ट आणि शिल्पा शेट्टीचं वजन घटवण्यासाठी मदत करणा-या विनोद चन्ना यांना विचारले असता, त्यांनी गर्भधारणेनंतरही महिला फिटनेसपणा जपू शकतात, असं सांगितलं. तसेच गर्भवती असताना महिलांचा चुकीचा आहार आणि चालण्याच्या अभावामुळे गर्भधारणेनंतरच्या काळात 10-15 किलो वजन वाढत असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.
महिलांनी गर्भधारणेच्या काळात काळजी घेण्याचाही त्यांनी सल्ला दिला आहे. शिल्पा शेट्टीनं बाळंतपणानंतर वजन घटवण्यासाठी सुद्ढ आहारसोबत कठीण व्यायाम केला. त्यावेळी तिला मान, गुडघे आणि पाठीच्या मणक्याचा खूप त्रास झाला. मात्र त्याकडे दुर्लक्ष करत तिने केलेल्या व्यायामामुळेच तिला एवढं वजन घटवणं शक्य झाल्याचं चन्ना म्हणालेत.