कहाणी पूर्ण करण्यासाठी ती परत आली
By Admin | Updated: November 1, 2015 02:06 IST2015-11-01T02:06:59+5:302015-11-01T02:06:59+5:30
सापांची स्वप्नं अनेकांना पडतात. या स्वप्नांचे अनेक अर्थसुद्धा काढले जातात. जसं स्वप्नात एखादा साप तुमचा पाठलाग करत आहे आणि त्याने तुम्हाला दंश केला तर हे धन, सन्मान

कहाणी पूर्ण करण्यासाठी ती परत आली
सापांची स्वप्नं अनेकांना पडतात. या स्वप्नांचे अनेक अर्थसुद्धा काढले जातात. जसं स्वप्नात एखादा साप तुमचा पाठलाग करत आहे आणि त्याने तुम्हाला दंश केला तर हे धन, सन्मान मिळण्याचे संकेत आहेत. तसेच स्वप्नात सापाला मारणे विजयाचे संकेत मानले जाते.
पण जर इच्छाधारी नागीण तुमच्या स्वप्नात येत असेल आणि तुमची झोप उडवून जीवन असह्य करत असेल तर...? असंच काहीसं कलर्स वाहिनीवरील नागीण या नव्या मालिकेतील हृतिकसोबत होत आहे.
तो योगायोगाने आपल्या जुन्या हवेलीमध्ये जातो आणि हृतिकची स्वप्नं हळूहळू त्याला प्रत्यक्षात घडताना दिसू लागतात. याबद्दल त्याच्या परिवाराने त्याला कधीच काही सांगितलेलं नाही. असं कोणतं रहस्य या हवेलीत गाडलं गेलंय, जे हृतिकला सांगितलं गेलं नाही. ज्यापासून हृतिक अनभिज्ञ आहे. काय आहे ते रहस्य? या सगळ्या घटनांनी तो त्रासला गेलाय आणि म्हणूनच अखेर इच्छाधारी नागिणीविषयी हृतिक आपल्या आईला विचारतो. तेव्हा त्याची आई त्याला एक मान्यता सांगते की, प्रत्येक बोधी अमावस्येच्या रात्री, शिवरात्रीच्या पूजेत लाखो नाग नागमंदिरात एकत्र येतात. या नागांमध्ये ते इच्छाधारी नागसुद्धा असतात, जे भगवान शिवाची शंभर वर्षे तपश्चर्या करून इच्छाधारी होण्याचं वरदान मिळवतात. म्हणजेच आपल्या इच्छेनुसार केव्हाही माणूस होण्याचं वरदान त्यांना मिळतं. हे सगळं जाणून घेतल्यानंतरही हृतिकची चिंता दूर होत नाही. त्याला हे कळत नाही की वर्षानुवर्षे नागिणीचं त्याच्या स्वप्नात येऊन त्याला त्रास देण्यामागचा हेतू काय आहे? आणि ती फक्त त्यालाच का दिसते? हे सर्व रहस्य ‘प्रेम आणि सुडाची कहाणी नागीण’ या मालिकेत जाणून घेता येईल. १ नोव्हेंबरपासून दर शनिवारी आणि रविवारी रात्री ८ वा. कलर्स वाहिनीवर ही मालिका सुरू होत आहे.