'लग्न टिकवायचं असेल तर स्त्रीने नेहमीच..." शर्मिला टागोर यांनी लेक सोहाला दिला होता 'हा' सल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 13, 2025 17:46 IST2025-07-13T17:46:44+5:302025-07-13T17:46:56+5:30

लग्न टिकवायचंय? शर्मिला टागोर यांनी दिला असा सल्ला की, ऐकून तुम्हीही थक्क व्हाल!

Sharmila Tagore Marriage Advice To Soha Ali Khan Woman Should Care Man Ego | 'लग्न टिकवायचं असेल तर स्त्रीने नेहमीच..." शर्मिला टागोर यांनी लेक सोहाला दिला होता 'हा' सल्ला

'लग्न टिकवायचं असेल तर स्त्रीने नेहमीच..." शर्मिला टागोर यांनी लेक सोहाला दिला होता 'हा' सल्ला

Sharmila Tagore’s Marriage Mantra: बॉलिवूडमधील सुप्रसिद्ध अभिनेत्री ज्यांनी त्यांच्या अभिनयाने एक काळ गाजवला त्या म्हणजे शर्मिला टागोर  (Sharmila Tagore). अभिनयासोबत त्यांनी सौंदर्याने प्रेक्षकांना भुरळ घातली होती. शर्मिला यांचं आयुष्य जितकं यशस्वी आहे, तितकंच ते अनुभवांनी समृद्धही आहे. एक आदर्श पत्नी, आई आणि सून म्हणून त्यांनी आपलं कर्तव्य पार पाडलं. शर्मिला आणि मन्सूर अली खान पटौदी यांचं नातं कायमच आदर्श मानलं गेलं आहे.  जेव्हा त्याची लेक सोहाचं लग्न झालं, तेव्हा शर्मिला यांनी लेकीला लग्न टिकवण्यासाठी साध्या पण प्रभावी शब्दांत त्यांनी एक सल्ला दिला होता. तर तो सल्ला काय होता, याबद्दल जाणून घेऊया. 

सोहाने जेव्हा अभिनेता कुणाल खेमू याच्याशी लग्न केले, तेव्हा शर्मिला टागोर यांनी एक सल्ला दिला होता. स्त्रीने नेहमीच पुरुषाच्या अहंकाराची काळजी घेतली पाहिजे असा सल्ला आईनं दिल्याचं सोहानं सांगितलं होतं. ती म्हणाली, "माझ्या आईनं मला सांगितलं होतं की, स्त्रीने पुरुषाच्या अहंकाराची तर पुरुषाने स्त्रीच्या भावना समजून घ्यायला हव्यात. तुम्ही जर हे दोघं एकमेकांसाठी करू शकलात, तर तुमचं नातं दीर्घकाळ टिकेल आणि यशस्वीही ठरेल".

ती पुढे म्हणाली, "आजच्या काळात अनेक लोक म्हणतील की, पुरुषांनाही भावना असतात आणि स्त्रियांनाही अहंकार असतो. ते खरंच आहे. पण आईनं दिलेला हा सल्ला आजवर मला खूप उपयोगी ठरला आहे. माझ्या मते, दीर्घकालीन नातेसंबंध टिकवणं ही आयुष्यातली एक अत्यंत अवघड गोष्ट असते. अशा नात्यांमध्ये केवळ जोडीदार नाही, तर एकमेकांचा मित्र असणंही गरजेचं असतं. कारण जर तुम्ही प्रत्येक गोष्ट तुमच्या जोडीदारावर लादली, तर त्या नात्यावर खूप मोठा ताण निर्माण होतो". दरम्यान,  सोहाने हिंदू धर्मीय कुणाल खेमूसोबत २०१५ मध्ये लग्न करत संसार थाटला. त्यांना इनाया ही मुलगीदेखील आहे. 

Web Title: Sharmila Tagore Marriage Advice To Soha Ali Khan Woman Should Care Man Ego

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.