‘चलती का नाम गाडी’ला शाहरुखचा नकार
By Admin | Updated: December 16, 2014 00:52 IST2014-12-16T00:52:38+5:302014-12-16T00:52:38+5:30
चलती का नाम गाडी’ या सुपरहिट चित्रपटाचा रिमेक बनविण्याची योजना निर्माता रोहित शेट्टीने आखली आहे.

‘चलती का नाम गाडी’ला शाहरुखचा नकार
‘चलती का नाम गाडी’ या सुपरहिट चित्रपटाचा रिमेक बनविण्याची योजना निर्माता रोहित शेट्टीने आखली आहे. मूळ चित्रपटात अशोककुमार यांनी साकारलेल्या भूमिकेसाठी शाहरुखची, तक किशोरकुमारच्या भूमिकेसाठी अर्जुन कपूरची निवडही रोहितने केली होती. शाहरुखने या चित्रपटात काम करण्यास नकार दिल्याची चर्चा रंगली आहे. ‘फॅन’ आणि ‘रईस’ या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये शाहरुख सध्या व्यस्त आहे. याबरोबरच रोहित शेट्टीच्याच एका चित्रपटात तो भूमिका साकारणार आहे. या पार्श्वभूमीवर त्याच्याकडे ‘चलती का नाम गाडी’ साठी वेळच नव्हता. त्यामुळेच त्याने रोहितला नकार कळवला आहे.