पान मसाला जाहिरातीमधून अक्षयची माघार, आता अजय अन् शाहरुखसोबत 'या' अभिनेत्याची एन्ट्री

By ऑनलाइन लोकमत | Published: April 26, 2024 03:40 PM2024-04-26T15:40:32+5:302024-04-26T15:42:02+5:30

पान मसालाची नवीन जाहिराती पुन्हा एकदा व्हायरल होत आहे.

Shahrukh Khan Ajay Devgan And Tiger Shroff In Elaichi Advertisement Replace Akshay Kumar | पान मसाला जाहिरातीमधून अक्षयची माघार, आता अजय अन् शाहरुखसोबत 'या' अभिनेत्याची एन्ट्री

पान मसाला जाहिरातीमधून अक्षयची माघार, आता अजय अन् शाहरुखसोबत 'या' अभिनेत्याची एन्ट्री

शाहरुख खान आणि अजय देवगण पान मसालाच्या नवीन जाहिरातीसह परत आले आहेत. यावेळी अक्षय कुमारच्या जागी एका नव्या अभिनेत्याची एन्ट्री झाली आहे.  अक्षय हा शाहरुख खान आणि अजय देवगणसह  पान मसाला जाहिरातीचा ब्रँड ॲम्बेसेडर होता, पण चाहत्यांच्या नाराजीनंतर त्यानं पान मसाला जाहिराती करणार नसल्याचं जाहीर केलं होतं. आता त्यानं त्याचा शब्द पाळला आहे. नव्या जाहिरातीमध्ये अक्षयच्या जागी टायगर श्रॉफ सामील झाला आहे.

पान मसालाच्या नव्या जाहिरातीसाठी शाहरुख खान आणि अजय देवगण पुन्हा एकत्र आले आहेत.  यावेळी त्यांच्यासोबत टायगर श्रॉफही दिसून आला. यासोबतच नवीन जाहिरातीमध्ये अमायरा दस्तूर देखील आहे.  नव्या जाहिरातीत शाहरुख खान, अजय देवगण हे गाडीत असून ट्रॅफिकमध्ये अडकल्याचे दाखवण्यात आलं आहे. यानंतर टायगर आणि अमयारची एन्ट्री होते. आयपीएल सामन्यादरम्यान ही नवीन जाहिरात प्रीमियर झाली. आता ही जाहिरात सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

अभिनेत्यांच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर, अजय देवगण, शाहरुख खान आणि टायगर श्रॉफ हे तिघेही आगामी सिनेमांच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहेत. अजयचे दोन चित्रपट बॅक टू बॅक रिलीज झाले. एक 'शैतान' आणि दुसरा 'मैदान'. आता तो लवरच 'सिंघम अगेन'मधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तर शाहरुख खान हा सध्या क्रिकेट स्टेडियममध्ये त्याची आयपीएल टीम 'कोलकाता नाइट रायडर्स'ला चिअर करताना पाहायला मिळतोय. टायगर आणि अक्षयचा नुकतेच 'बडे मियाँ और छोटे मियाँ' हा सिनेमा रिलीज झाला आहे. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला.

Web Title: Shahrukh Khan Ajay Devgan And Tiger Shroff In Elaichi Advertisement Replace Akshay Kumar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.