शाहिद-मीराचे क्यूट घरगुती समीकरण
By Admin | Updated: July 2, 2016 03:07 IST2016-07-02T03:07:31+5:302016-07-02T03:07:31+5:30
प्रत्येक पती-पत्नीत भांडणे होतात. मग त्यात शाहिद-मीरा तरी का मागे राहतील?

शाहिद-मीराचे क्यूट घरगुती समीकरण
प्रत्येक पती-पत्नीत भांडणे होतात. मग त्यात शाहिद-मीरा तरी का मागे राहतील? वेल, हे खरं असलं तरी त्या दोघांची भांडणे काही फार विकोपाला जात नाहीत. शाहिद लवकर नाराज होतो आणि लवकर शांतही होतो. मीरा त्याच्यापेक्षा खूप शांत आणि अबोल आहे. जर शाहिदची चूक असेल, तर तो तिच्याशी बोलण्यासाठी पहिले पाऊल उचलतो. आणि जर मीराला त्याच्यासोबत झालेल्या भांडणाला सोडवायचे असेल तर ती प्रथम पाऊल उचलते. अशा प्रकारे ते दोघे एकमेकांमधील भांडणे सोडवतात. हे त्यांच्या वैवाहिक आयुष्याचे खरे समीकरण आहे.