शाहिद-मीरा विवाहबद्ध
By Admin | Updated: July 7, 2015 23:40 IST2015-07-07T23:40:11+5:302015-07-07T23:40:11+5:30
अभिनेता शाहिद कपूर आणि दिल्लीची मीरा राजपूत प्रेमकहाणीला पूर्णविराम देत विवाहबंधनात मंगळवारी बांधले गेले आहेत.
शाहिद-मीरा विवाहबद्ध
नवी दिल्ली : अभिनेता शाहिद कपूर आणि दिल्लीची मीरा राजपूत प्रेमकहाणीला पूर्णविराम देत विवाहबंधनात मंगळवारी बांधले गेले आहेत. दिल्लीजवळील गुडगाव येथे फार्महाऊसवर राधास्वामी संप्रदायाच्या परंपरेनुसार विवाहविधी पार पाडण्यात आला तेव्हा निकटस्थ नातेवाईकांसह अवघ्या ४० पाहुण्यांची उपस्थिती होती.
३४ वर्षीय शाहिद ज्येष्ठ अभिनेते पंकज कपूर आणि त्यांच्या पूर्वाश्रमीच्या पत्नी नीलिमा अजीम यांचा मुलगा असून २१ वर्षीय मीरा राजपूत हिच्यासोबतच्या त्याच्या प्रेमसंबंधांची गेल्या काही दिवसांपासून चर्चा सुरू होती. मीरा हिने याच वर्षी दिल्ली विद्यापीठातील लेडी श्रीराम कॉलेजमधून इंग्रजी आॅनर्स ही पदवी घेतली आहे.
शाहिदने पांढरा कुर्ता-पायजमा आणि साफा परिधान केला होता. अगदी साधा मेकअप आणि कपाळावर ‘मांग टिका’ लावलेल्या मीराने हिरवा-गुलाबी सलवार- कुर्ता आणि कलाकुसर केलेला दुपट्टा परिधान केला होता. (वृत्तसंस्था)
> सोमवारी संध्याकाळी संगीत कार्यक्रमात त्याने वडील पंकज कपूर दिग्दर्शित ‘मौसम’ या चित्रपटातील ‘सज धज के’ या गाण्यावर मीरासोबत केलेले नृत्य सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.
> मंगळवारी पंचतारांकित मेजवानीचे २५० पाहुण्यांना निमंत्रण देण्यात आले होते.
> १२ जुलै रोजी शाहिदने मुंबईत स्वागत समारंभ आयोजित केला असून दिल्लीचे कार्ड डिझायनर रवीश कपूर यांच्याकडे निमंत्रणाची जबाबदारी आहे.