ज्येष्ठ अभिनेते सईद जाफरी कालवश
By Admin | Updated: November 16, 2015 12:18 IST2015-11-16T11:58:39+5:302015-11-16T12:18:15+5:30
राम तेरी गंगा मैली, हिना, शतरंज के खिलाडी अशा हिंदी चित्रपटांसोबतच अनेक ब्रिटीश चित्रपटांमध्येही स्वतःच्या अभिनयाचा ठसा उमटवणारे ज्येष्ठ अभिनेते सईद जाफरी यांचे सोमवारी सकाळी निधन झाले.

ज्येष्ठ अभिनेते सईद जाफरी कालवश
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. १६ - राम तेरी गंगा मैली, हिना, शतरंज के खिलाडी अशा हिंदी चित्रपटांसोबतच अनेक ब्रिटीश चित्रपटांमध्येही स्वतःच्या अभिनयाचा ठसा उमटवणारे ज्येष्ठ अभिनेते सईद जाफरी यांचे सोमवारी सकाळी निधन झाले. वयाच्या ८६ व्या वर्षी जाफरी यांनी अखेरचा श्वास घेतला.
भारतात जन्मलेले ब्रिटीश अभिनेते सईद जाफरी यांचा जन्म ८ जानेवारी १९२९ रोजी झाला होता. महाविद्यालयीन शिक्षणानंतर सईद यांनी युनिटी नामक नाट्य निर्मात्या संस्थेची स्थापना केली होती. यानंतर त्यांनी लंडन व अमेरिकेत नाट्यक्षेत्रातील शिक्षण घेतले. भारतात परतल्यावर सईद यांनी अनेक हिंदी व ब्रिटीश चित्रपटांमध्ये महत्त्वाच्या भूमिका साकारल्या होत्या. गांधी, शतरंज के खिलाडी, मसाला या चित्रपटांमधील त्यांच्या भूमिका गाजल्या होत्या.