पाहा : सलमानच्या लाडक्या भाच्याचे राखी सेलिब्रेशन
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 18, 2016 22:15 IST2016-08-18T16:44:03+5:302016-08-18T22:15:17+5:30
सलमान आणि त्याच्या बहिणींनी आज रक्षाबंधनाचा सण आनंदात साजरा केला. सलमानच्या कुटुंबातील आणखी एका क्यूट सदस्यानेही आपली पहिली राखी सेलिब्रेट केली.
.jpg)
पाहा : सलमानच्या लाडक्या भाच्याचे राखी सेलिब्रेशन
र ्षाबंधनाचा सण म्हणजे भाऊ-बहिणींचे प्रेम, कुटुंबाचा गोतावळा आणि आनंदाला उधाण... सलमान खानच्या कुटुंबातही आज यापेक्षा वेगळे वातावरण नव्हते. सलमान आणि त्याच्या बहिणींनी आज रक्षाबंधनाचा सण आनंदात साजरा केला. अलविरा आणि अर्पिता यांनी सलमानला मोठ्या प्रेमाने राखी बांधली आणि सलमानेही तितक्याच प्रेमाने ती बांधून घेतली. सलमानच्या कुटुंबातील आणखी एका क्यूट सदस्यानेही आपली पहिली राखी सेलिब्रेट केली. होय, मामूचा लाडका भाचा अहिल. अहिलचे हे पहिले राखी सेलिब्रेशन. अतुल अग्निहोत्रीच्या मुलीने अहिलला छोट्याशा हातावर राखी बांधली. सो क्यूट ना! तेव्हा तुम्ही बघा, खान कुटुंबाचे राखी सेलिब्रेशन!!
![]()
![]()