तारीख लिहून ठेवा! अमिताभ-प्रभासच्या आगामी 'कल्की' सिनेमाची रिलीज डेट जाहीर

By ऑनलाइन लोकमत | Published: April 28, 2024 11:46 AM2024-04-28T11:46:16+5:302024-04-28T11:46:36+5:30

अमिताभ - प्रभास यांच्या कल्की सिनेमाची रिलीज डेट जाहीर झालीय. क्लिक करुन जाणून घ्या (kalki, amitabh bachchan, prabhas)

Save the date Kalki 2898 AD to hit theatres on 27th June 2024 | तारीख लिहून ठेवा! अमिताभ-प्रभासच्या आगामी 'कल्की' सिनेमाची रिलीज डेट जाहीर

तारीख लिहून ठेवा! अमिताभ-प्रभासच्या आगामी 'कल्की' सिनेमाची रिलीज डेट जाहीर

या वर्षीचा बहुप्रतिक्षित असलेला साय-फाय सिनेमा म्हणजे 'कल्की 2898 एडी'. अमिताभ बच्चन, कमल हासन, प्रभास यांसारख्या दिग्गजांसह  दीपिका पदुकोण आणि दिशा पटानी सुद्धा सिनेमात प्रमुख भूमिकेत आहेत. सध्या या चित्रपटाने प्रचंड लक्ष वेधून घेतले आहे. याशिवाय सर्व चाहत्यांना सिनेमाच्या रिलीजची आतुरता आहे. अखेर काल  'कल्की 2898 एडी' च्या रिलीज डेटची घोषणा झालीय. 

 'कल्की 2898 एडी' च्या रिलीज तारखेच्या अगदी दोन महिने अगोदर सिनेमाची रिलीज डेट सोशल मीडियावर जाहीर करण्यात आलीय. सोशल मीडियावर निर्मात्यांनी याविषयी मोठी घोषणा केलीय. आता 'कल्की 2898 एडी' 27 जून 2024 रोजी रिलीज होण्याच्या तयारीत आहे. त्यामुळे सर्वांची उत्सुकता शिगेला आहे. काहीच दिवसांपुर्वी सिनेमातील अमिताभ यांची भूमिका असलेला अश्वत्थामाचा लूक रिव्हिल करण्यात आलेला.

अमिताभ यांचा अश्वत्थामा लूक रिव्हिल करताना बीग बींच्या आश्चर्यकारक डी-एजिंग ट्रान्सफॉर्मेशनसह हा लूक शेअर करण्यात आला. यात वयाची ८० उलटलेले अमिताभ एकदम तरुण दिसले. नाग अश्विन दिग्दर्शित, कल्की 2898 एडी' हा वर्षातील सर्वात मोठा सिनेमॅटिक अनुभव ठरेल यात शंका नाही. वैजयंती मूव्हीज निर्मित हा सिनेमा 27 जून 2024 रोजी जगभरात रिलीज होणार आहे.

Web Title: Save the date Kalki 2898 AD to hit theatres on 27th June 2024

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.