सैराटच्या आर्चीची छेडछाड

By Admin | Published: March 22, 2017 10:58 PM2017-03-22T22:58:31+5:302017-03-22T23:00:14+5:30

2016 मध्ये संपुर्ण महाराष्ट्राला याड लावणा-या सैराटचित्रपटातील आर्ची उर्फ रिंकू राजगुरुची छेडछाड केल्याप्रकरणी एकाला अटक करण्यात आली आहे.

Sarchate's Archie cruise | सैराटच्या आर्चीची छेडछाड

सैराटच्या आर्चीची छेडछाड

googlenewsNext

tyle="text-align: justify;">ऑनलाइन लोकमत
सोलापूर, दि. 22 - 2016 मध्ये संपुर्ण महाराष्ट्राला याड लावणा-या सैराट चित्रपटातील आर्ची उर्फ रिंकू राजगुरुची छेडछाड केल्याप्रकरणी एकाला अटक करण्यात आली आहे. सोलापुरातील येथील अकलूज पोलिसात तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रिंकूची छेडछाड करणारा आरोपी ठाण्याचा रहिवासी असल्याची माहिती आहे.

एबीपी माझाच्या वृत्तानुसार, अकलूजमध्ये रिंकूशी छेडछाड झाल्यानंतर तरुणाविरोधात तात्काळ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर पोलिसांनी ठाण्याच्या आरोपीला ताब्यात घेतलं आहे. आज त्याला माळशिरस येथील दिवाणी न्यायालयात आरोपीला उशिरा हजर करण्यात आलं होतं. या प्रकरणी पुढील सुनावणी गुरुवारी होणार आहे.

सैराट चित्रपटामुळे प्रसिद्ध झालेली अभिनेत्री रिंकू राजगुरु हिने सैराटच्या कन्नड रिमेकमध्येही मुख्य भूमिका साकारली आहे. रिंकू राजगुरु यंदा दहावीच्या परीक्षेला बसली आहे.

Web Title: Sarchate's Archie cruise

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.