आयटम गर्लसोबत वर्कआऊट करतेय सारा!
By Admin | Updated: June 2, 2017 04:36 IST2017-06-02T04:36:25+5:302017-06-02T04:36:25+5:30
अभिनेता सैफ अली खान याची मुलगी साराअली खान लवकरच बॉलिवूड डेब्यू करणार असल्याची चर्चा आहे. जेव्हा-जेव्हा ती बॉलिवूड

आयटम गर्लसोबत वर्कआऊट करतेय सारा!
अभिनेता सैफ अली खान याची मुलगी साराअली खान लवकरच बॉलिवूड डेब्यू करणार असल्याची चर्चा आहे. जेव्हा-जेव्हा ती बॉलिवूड पार्ट्यांमध्ये हजेरी लावते तेव्हा-तेव्हा तिच्या डेब्यूच्या चर्चा जास्तच रंगविल्या जातात. सारा सध्या तिच्या डेब्यूची तयारी करीत असून त्यासाठी ती तिच्या फिगरविषयी जागरूक असल्याचे दिसून येत आहे. यासाठी ती बॉलिवूडची सर्वात ‘हॉट अॅण्ड सेक्सी’ आयटम गर्ल मलाइका अरोरा हिच्याकडून टिप्स घेत असल्याचे समजते. मलाइकाने शेअर केलेल्या एका फोटोमध्ये सारा अन् ती वर्कआऊट करताना दिसून येत आहे. मलाइकाने शेअर केलेला हा फोटो जिममधील असून दोघीही वर्कआऊट करताना चांगलाच घाम गाळताना दिसत आहेत. या वेळी मलाइकाने या फोटोला गमतीशीर कॅप्शन देताना लिहिले की, ‘तीन माकडं लटकलेली, आता मला हे नका विचारू की ती का लटकली? मात्र आम्हाला खूप मज्जा आली. एक तर सारा अली खान अन् दुसरी नम्रता पुरोहित.’ काही दिवसांपूर्वीच अभिनेत्री निमरत कौर हिनेही सारासोबतचा एक फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला होता.