संजीदा शेख म्हणतेय स्क्रीनवर किसिंग नो रे बाबा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2017 12:23 IST2017-04-28T06:53:40+5:302017-04-28T12:23:40+5:30

संजीदा शेखने क्या होगा निम्मो का या मालिकेद्वारे तिच्या कारकिर्दीला सुरुवात केली. ती आज अनेक वर्षं छोट्या पडद्यावर काम ...

Sanjida Shaikh says that on screen Kissing no ray Baba | संजीदा शेख म्हणतेय स्क्रीनवर किसिंग नो रे बाबा

संजीदा शेख म्हणतेय स्क्रीनवर किसिंग नो रे बाबा

जीदा शेखने क्या होगा निम्मो का या मालिकेद्वारे तिच्या कारकिर्दीला सुरुवात केली. ती आज अनेक वर्षं छोट्या पडद्यावर काम करत आहे. ती गेल्या काही वर्षांत जाने पहचाने से अजनबी, एक हसिना थी यांसारख्या अनेक मालिकांमध्ये झळकली आहे. त्यातील तिच्या अनेक मालिका प्रचंड हिट झाल्या आहेत. 
संजीदाचे आमिर अलीसोबत लग्न झाले असून तोदेखील एक अभिनेता आहे. त्यांच्या लग्नाला आता जवळजवळ चार-पाच वर्षं झाली आहे. त्या दोघांची केमिस्ट्री खूपच चांगली आहे. ते दोघे एकाच क्षेत्रातले असले तरी कधीच एकमेकांच्या कामांमध्ये ढवळाढवळ करत नाहीत. 
चित्रपट अथवा मालिका म्हटल्या की त्यात बोल्ड सीन असणे किंवा किसिंग सीन असणे यात काही नवीन नाही. सध्या चित्रपटातील कलाकारांप्रमाणे मालिकेतील कलाकारदेखील बोल्ड सीन, किसिंग सीन द्यायला तयार असतात. पण काहीही झाले तरी मी स्क्रीनवर किसिंग सीन देणार नाही असे संजीदा शेखने ठरवले आहे. 
संजीदा आता लव्ह का है इंजतार या मालिकेत कामिनी माथुर ही व्यक्तिरेखा साकारणार आहे. काहीही झाले तरी मी किसिंग सीन कोणत्याही मालिकेसाठी देणार नाही. कारण त्यात मी कर्म्फटेबल असूच शकत नाही असे संजीदा सांगते. 
संजीदा दुसऱ्या कोणत्या अभिनेत्यासोबत सोडा पण आमिरसोबतही स्क्रीनवर किसिंग सीन द्यायला तयार नाहीये. लव्ह का इंजजार या मालिकेत प्रेक्षकांना किथ सिक्वेरा आणि तिची खूप छान केमिस्ट्री पाहायला मिळणार आहे. पण या मालिकेतदेखील किसिंग सीन देणार नसल्याचे संजीदाने सुरुवातीलाच या मालिकेच्या टीमला स्पष्ट केले आहे. 

Web Title: Sanjida Shaikh says that on screen Kissing no ray Baba

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.