संजयचा ‘गुरू’ अॅक्शनसाठी रेडी
By Admin | Updated: November 5, 2015 01:48 IST2015-11-05T01:48:51+5:302015-11-05T01:48:51+5:30
संजय जाधव यांच्या ‘दुनियादारी’, ‘प्यारवाली लव्हस्टोरी’, ‘क्लासमेट्स’ आणि ‘तू हि रे’ या चित्रपटांनी मराठी प्रेक्षक चित्रपटगृहाकडे परत आणायला मोलाचा हातभार लावला आहे.

संजयचा ‘गुरू’ अॅक्शनसाठी रेडी
संजय जाधव यांच्या ‘दुनियादारी’, ‘प्यारवाली लव्हस्टोरी’, ‘क्लासमेट्स’ आणि ‘तू हि रे’ या चित्रपटांनी मराठी प्रेक्षक चित्रपटगृहाकडे परत आणायला मोलाचा हातभार लावला आहे. आता त्यांचा अजून एक चित्रपट ‘गुरू’ आपल्याला लवकरच पाहायला मिळणार आहे. सध्या हा चित्रपट लाइट्स, कॅमेरा, अॅक्शन असे म्हणण्यासाठी रेडी झाला आहे. या चित्रपटाबाबत प्रचंड गुप्तता पाळण्यात आली होती. अंकुश चौधरी या चित्रपटात मुख्य भूमिकेत पाहायला मिळणार असल्याची चर्चा नुसतीच रंगत होती. पण आता लवकरच कळेल की आपल्याला कोण कोण कलाकार यामध्ये पाहायला मिळणार आहेत.