Video: रवीना टंडनच्या लेकीला संजय दत्त ओळखत नाही? पापाराझींना अभिनेत्याने विचारलं, "कोण राशा?"
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 26, 2025 16:09 IST2025-05-26T16:07:09+5:302025-05-26T16:09:56+5:30
संजय दत्तचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत संजय दत्तने रवीना टंडनची मुलगी राशाला ओळखलं नाही, असं दिसतंय.

Video: रवीना टंडनच्या लेकीला संजय दत्त ओळखत नाही? पापाराझींना अभिनेत्याने विचारलं, "कोण राशा?"
बॉलिवूड अभिनेता संजय दत्तचा (sanjay dutt) हा सतत काही ना काही कारणामुळे चर्चेत असतो. संजूबाबाचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये तो रवीना टंडनची (raveena tondon) मुलगी राशा थडानीला (rasha thadani) ओळखत नाही, असं दिसतंय. मुंबईतील एका रेस्टॉरंटबाहेर पावसात संजय दत्त बाहेर पडताना पापाराझींशी संवाद साधताना दिसतो. तेव्हा तो पापाराझींना पावसामुळे घरी जाण्याचा सल्ला देतो. त्यावेळी ही गोष्ट घडल्याचं दिसलं.
संजय दत्त राशाला ओळखत नाही?
झालं असं की, संजूबाबा पावसात बाहेर उभ्या असलेल्या पापाराझींना निघायला सांगतो. तेव्हा पापाराझी संजूबाबाला म्हणतात, "आम्ही राशासाठी थांबलो आहे". तेव्हा संजूबाबा त्यांना विचारतो, "कोण?" पापाराझी पुन्हा त्याला "राशा" असं सांगतात. संजूबाबा पुन्हा त्यांना "कोण" म्हणून विचारतो. तेव्हा पापाराझी सांगतात की, "ती रवीना टंडनची मुलगी आहे". हे ऐकताच संजूबाबा ठीक आहे, म्हणत सर्वांचा निरोप घेत गाडीत बसून निघून जातो. अशाप्रकारे संजय दत्त राशाला ओळखत नाही का? अशी चर्चा आहे.
राशा थडानी ही रवीना टंडन आणि अनिल थडानी यांची मुलगी आहे. २०२५ मध्ये 'आझाद' या चित्रपटाद्वारे तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आहे. तिच्या अभिनयाची आणि डान्सची चांगलीच चर्चा रंगली. संजय दत्त आणि रवीना टंडन या दोघांनी 'घुडचडी' (२०२४) या चित्रपटात एकत्र काम केले आहे. या घटनेनंतर सोशल मीडियावर संजय दत्तच्या प्रतिक्रियेची चर्चा आहे. संजय दत्त सध्या 'धुरंधर' या बॉलिवूड सिनेमाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे.