रिश्ता पक्का! कथित बॉयफ्रेंडसोबत समंथाने शेअर केला रोमँटिक फोटो, दिसतेय हॉट; म्हणाली...
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2025 10:26 IST2025-11-08T10:24:07+5:302025-11-08T10:26:27+5:30
समंथाच्या फोटोवर चाहत्यांच्या तुफान कमेंट्स

रिश्ता पक्का! कथित बॉयफ्रेंडसोबत समंथाने शेअर केला रोमँटिक फोटो, दिसतेय हॉट; म्हणाली...
अभिनेत्री समंथा रुथ प्रभू वैयक्तिक आयुष्यामुळे जास्त चर्चेत आहे. दिग्दर्शक राज निदिमोरुला ती डेट करत आहे. तर आता समंथाने तिचं हे नातं जवळपास कन्फर्मच केलं आहे. राजच्या कुटुंबियांसोबत तिने यावेळी दिवाळी साजरी केली. तर आता तिने राजसोबत कोजी फोटोही शेअर केला आहे. यामुळे त्यांचं नातं आता जगजाहीरच झालं आहे. दरम्यान राज घटस्फोटित असून त्याची पूर्व पत्नी अनेकदा क्रिप्टिक पोस्ट करत त्यांच्या नात्यावर निशाणा साधत असते.
समंथा प्रभूने इन्स्टाग्रामवर काही फोटो सीरिज शेअर केलि आहे. तिने नुकतंच स्वत:चा परफ्युम ब्रँड लाँच केला. या फोटोंमध्ये आठव्या फोटोने सर्वांचंच लक्ष वेधलं. यामध्ये समंथा ब्लॅक नेट ड्रेसमध्ये हॉट दिसत आहे. इतकंच नाही तर ती राजच्या मिठीत आहे. ब्लॅक सूटबूट घालून राजने समंथाला आपल्या मिठीत घेतलेलं दिसत आहे. तर त्याच्या एका हातात ड्रिंकचा ग्लास आहे. हा त्यांचा रोमँटिक कोजी फोटो क्षणात व्हायरल झाला आहे. त्यांच्या या फोटोतून दोघं आता एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडाल्याचंही दिसून येत आहे.
समंथाने या फोटोंना कॅप्शन देत लिहिले, "कुटुंब आणि मित्रपरिवारासोबत आहे. गेल्या दीड वर्षांपासून मी करिअरमध्ये काही बोल्ड निर्णय घेतले. रिस्क घेतली, माझ्या अंतरात्मावर विश्वास ठेवला आणि शिकत राहिले. आज मी माझे छोटे छोटे यश साजरे करत आहे. मला हुशार, तेजस्वी, अतिशय मेहनती आणि प्रामाणिक लोक भेटले, त्यांच्यासोबत मला काम करता आलं यासाठी मी आभारी आहे. ही फक्त सुरुवात आहे."
समंथाच्या या पोस्टवर चाहत्यांनी 'अब तो रिश्ता पक्का' अशा कमेंट्स केल्या आहेत. राज-डीके ही दिग्दर्शक जोडी सर्वात चर्चेत आहे. त्यांच्या 'फॅमिली मॅन'सीरिजचा आता तिसरा भाग येत आहे. तर समंथाची भूमिका असलेली 'सिटाडेल हनीबनी' सीरिजही राज-डीके यांनी दिग्दर्शित केली होती. याच सेटवर दोघं प्रेमात पडले होते.