सलमानच्या 'सुलतान' चित्रपटाचा फर्स्ट लूक पोस्टर जाहीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2016 18:26 IST2016-04-11T18:26:56+5:302016-04-11T18:26:56+5:30
त तो छोटे केस आणि मिशी अशा लूकमध्ये असून यामध्ये तो कुस्ती खेळण्यासाठी तयार असलेल्या पोजमध्ये दिसतो. या बहुचर्चित चित्रपटात सलमान हरियाणाचे कुस्तीपटू सुल्तान अली खान यांची भूमिका साकारत आहे

सलमानच्या 'सुलतान' चित्रपटाचा फर्स्ट लूक पोस्टर जाहीर
>ऑनलाईन लोकमत
मुंबई, दि. ११ - अभिनेता सलमान खानच्या बहुचर्चित 'सुलतान'चा फर्स्ट लूक पोस्टर जाहीर झाला आहे. चित्रपट तज्ञ तरन अदर्श यांनी ट्विटरवरून सुलतान चित्रपटातील एक फोटो अपलोड केला आहे.
त्यात तो छोटे केस आणि मिशी अशा लूकमध्ये असून यामध्ये तो कुस्ती खेळण्यासाठी तयार असलेल्या पोजमध्ये दिसतो. या बहुचर्चित चित्रपटात सलमान हरियाणाचे कुस्तीपटू सुल्तान अली खान यांची भूमिका साकारत आहे. यशराज फिल्म्सच्या या चित्रपटाचे दिग्दर्शन अली अब्बास जफरने केले आहे. तर सलमान खानच्या नायिकेच्या भूमिकेत अनुष्का शर्मा आहे.
सुलतान हा चित्रपट ईद २०१६ला प्रदर्शित होणार आहे. त्याच दिवशी शाहरुख खानचा रईसही प्रदर्शित होणार असल्यामुळे प्रेषकांना या दोन्हीची उस्तुकता लागली आहे. तिकट खिडकीवर कोणाचा पारडे जड होते याकडे सर्व चित्रपट रसिकांचे लक्ष लागले आहे.
Here's the superb first look poster of #Sultan. Waiting eagerly for this movie! #Eid2016#YRFpic.twitter.com/Ljks3G7wid— taran adarsh (@taran_adarsh) April 11, 2016