सलमानचे वय ६४ वर्षे!

By Admin | Updated: February 6, 2016 02:37 IST2016-02-06T02:37:33+5:302016-02-06T02:37:33+5:30

तरुण आणि देखण्या सलमान खानचे वय ६४ वर्षे आहे, असे सांगितले तर तुमचा विश्वास बसेल का? परंतु निवडणुकीसाठी बनविण्यात आलेल्या मतदार यादीत तरी असेच दिसत आहे.

Salman's age is 64 years! | सलमानचे वय ६४ वर्षे!

सलमानचे वय ६४ वर्षे!

तरुण आणि देखण्या सलमान खानचे वय ६४ वर्षे आहे, असे सांगितले तर तुमचा विश्वास बसेल का? परंतु निवडणुकीसाठी बनविण्यात आलेल्या मतदार यादीत तरी असेच दिसत आहे. हैदराबाद येथे झालेल्या महापालिकांच्या निवडणुकीत अभिनेता सलमान याचे नाव मतदार यादीत असून त्याच्या ओळखपत्रावर ६४ वर्षे वयाचा उल्लेख करण्यात आला आहे. हे बघून हैदराबादचे मतदार खूपच आनंदित झाले. या निवडणुकीत मतदानासाठी सलमान खान येणार म्हणून त्याची वाट पाहत बसले. परंतु सलमान काही आला नाही. मुंबई येथील मतदार यादीतही सलमानचे नाव आहे. त्यामुळे सलमानचे दोन ठिकाणी मतदान आहे का, याचा शोध घेण्याचे आदेश निवडणूक आयोगाने दिले असल्याची माहिती आहे.
दोन मतदार ओळखपत्रे बनली
सलमान संध्याकाळपर्यंत मतदानासाठी काही आला नाही. अखेर लोकांना नाराज होऊन घरी जावे लागले. या मतदान कार्डावर अगोदरही मतदान झाल्याचे समोर आले आहे. याचा अर्थ सलमानची दोन मतदान कार्ड बनली आहेत. यावरूनच या संपूर्ण प्रकरणात जी.एच.एम.सी.चे उपायुक्त कृष्णा शेखर यांनी चौकशीचे आश्वासन दिले आहे. त्यांचे म्हणणे आहे की, हैदराबाद महानगरपालिकेच्या मतदानात ७२ लाख मतदारांनी मतदान केले आहे. ७ हजार बुथवर १ हजार ३०० उमेदवारांसाठी मतदान झाले आहे. अशातच हे प्रकरण कसे घडले याची पूर्ण चौकशी होईल. त्यानंतरच या प्रकरणाविषयी बोेलले जाऊ शकते.
सलमान खानच्या हैदराबाद मतदार कार्डावरही त्याच्या वडिलांचे नाव सलीम असेच आहे. कार्ड नं. वाय व्ही ओ १३६०३९५ मध्ये सलमानचे छायाचित्रही आहे आणि त्यासोबत त्याचे वयदेखील लिहिले आहे. हे बघून लोक सलमान खानच्या येण्याची वाट बघत होते. सर्वात मनोरंजक गोष्ट ही की अनेकांचे मतदान होऊनही ते बुथच्या सभोवतालीच घुटमळत होते. या सर्वांना सलमानची एक झलक पाहायची होती.

Web Title: Salman's age is 64 years!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.