सलमान अजूनही कतरिनामय
By Admin | Updated: May 20, 2015 23:23 IST2015-05-20T23:23:01+5:302015-05-20T23:23:01+5:30
सलमानपासून दूर झाल्यानंतर कतरिना सध्या रणबीरच्या प्रेमात मश्गूल आहे. कॅट जरी त्याला विसरली असली तरीही ‘दबंग’ स्टार सलमान अजूनही कतरिनाच्या आठवणीत आहे.

सलमान अजूनही कतरिनामय
सलमानपासून दूर झाल्यानंतर कतरिना सध्या रणबीरच्या प्रेमात मश्गूल आहे. कॅट जरी त्याला विसरली असली तरीही ‘दबंग’ स्टार सलमान अजूनही कतरिनाच्या आठवणीत आहे. ‘बजरंगी भाईजान’च्या चित्रीकरणासाठी सलमान सध्या काश्मीरमध्ये आहे. नैसर्गिक सौंदर्याचा खजिना असलेल्या काश्मीरचे वर्णन शब्दांत करणे अवघड असून, मोजक्या शब्दांत वर्णन करायचे झालेच तर ‘माशा अल्लाह’ असेच म्हणावे लागेल, असे सलमानने आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. माशा अल्लाह म्हणता म्हणता कतरिना कैफदेखील काश्मीरचीच असल्याची आठवल्याचेही सलमानने ट्विट केले आहे.