सलमान अजून ‘बच्चा’ - नवाजुद्दीन
By Admin | Updated: July 16, 2015 15:09 IST2015-07-16T05:17:34+5:302015-07-16T15:09:39+5:30
बजरंगी भाईजानमध्ये सलमान खानसबोत झळकणारा अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी म्हणतो, सलमान लहान मुलाप्रमाणे निरागस आहे.

सलमान अजून ‘बच्चा’ - नवाजुद्दीन
अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी बॉलीवुडमधील मोठ्या अभिनेत्यांसोबत सध्या काम करत आहे. ते सध्या त्यांच्या ‘बजरंगी भाईजान’ मुळे चर्चेत आहेत. नवाजुद्दीनचे म्हणणे आहे की,‘ सलमान खान लहान मुलांप्रमाणे निरागस आहेत. जेव्हा आम्ही शूटिंग करायचो तेव्हा ब्रेक मध्ये ते खुप मस्ती करायचे. सलमान आणि माझ्यात एक घट्ट नातं तयार झालं आहे. शूटिंगनंतरही आम्ही खुप गप्पा मारायचो. मला जाणवले की, सलमानमध्ये एक लहान मुल आहे. नवाजुद्दीन लवकरच ‘मांझी’ मध्ये दिसणार आहे. या चित्रपटात त्याच्याविरूद्ध राधिका आपटे आहे. नवाजुद्दीनने चित्रपटात मुख्य भूमिका साकारली आहे. हा चित्रपट बिहारच्या एका साधारण व्यक्तीच्या असाधारण कथेवर आधारित आहे. ही कथा समर्पणवर आधारित आहे.