सलमानची मराठमोळ्या राकेश बापटला दाद...
By Admin | Updated: November 30, 2015 02:41 IST2015-11-30T02:41:41+5:302015-11-30T02:41:41+5:30
‘सलमान खान’ म्हणजे बिग बजेट चित्रपटांचा हुकमाचा एक्का. चित्रपटसृष्टीमध्ये त्याने अनेक नवोदित चेहऱ्यांना ब्रेक दिला. त्यामुळे त्याची दाद मिळणं हे कोणत्याही कलाकाराला वेड

सलमानची मराठमोळ्या राकेश बापटला दाद...
‘सलमान खान’ म्हणजे बिग बजेट चित्रपटांचा हुकमाचा एक्का. चित्रपटसृष्टीमध्ये त्याने अनेक नवोदित चेहऱ्यांना ब्रेक दिला. त्यामुळे त्याची दाद मिळणं हे कोणत्याही कलाकाराला वेड लावण्यासारखंच आहे. खरे तर एका कलाकाराचे दुसऱ्या कलाकाराने कौतुक करणे तसे दुर्मिळच, पण लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत अगदी सगळ्यांचा लाडका असलेला सलमान खान याने चक्क राकेश बापट या अभिनेत्याच्या पाठीवर शाबासकीची थाप दिली आहे. त्यामुळे अर्थातच हिंदी मालिकांमध्ये आपली वेगळी ओळख निर्माण करणारा राकेश बापट सध्या सातवे आसमानपर आहे. जबरदस्त अॅक्शन, ड्रामा आणि एंटरटेन्मेंटचा भरपूर मसाला असलेल्या वृंदावन सिनेमात राकेश मुख्य भूमिका साकारत आहे. राकेशची ही पहिलीच अॅक्शन फिल्म आहे. पहिल्याच फटक्यात सुपरस्टार सलमान खानने राकेशच्या अभिनयाचे कौतुक केले आहे. मुळातच वृंदावन सिनेमाची टीम ही साउथ बॅकग्राउंड असल्याने हिंदी सिनेसृष्टीतल्या अनेक नामवंत कलाकारांना दाखवण्यात आली. ‘रिअलिस्टिक फिल्म कंपनी’ या बॅनरखाली राजप्रेमी, संदीप शर्मा, सुनील खांदपूर या तिघांनी मिळून वृंदावन चित्रपटाची निर्मिती केली आहे. गणेश आचार्य चित्रपटातील कलाकारांसाठी कोरिओग्राफर लाभले असून, अमितराज यांनी सिनेमाला संगीत दिले आहे.