सलमान खानच्या दुबईवारीला हायकोर्टाची परवानगी
By Admin | Updated: May 26, 2015 13:03 IST2015-05-26T12:55:26+5:302015-05-26T13:03:56+5:30
हिट अँड रनप्रकरणात दोषी ठरलेल्या अभिनेता सलमान खानला मंगळवारी आणखी एक दिलासा मिळाला असून मुंबई हायकोर्टाने सलमानला दुबईत जाण्याची परवानगी दिली आहे.
सलमान खानच्या दुबईवारीला हायकोर्टाची परवानगी
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. २६ - हिट अँड रनप्रकरणात दोषी ठरलेल्या अभिनेता सलमान खानला मंगळवारी आणखी एक दिलासा मिळाला असून मुंबई हायकोर्टाने सलमानला दुबईत जाण्याची परवानगी दिली आहे.
हिट अँड रन प्रकरणात अभिनेता सलमान खानला पाच वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा झाली असून सध्या सलमान जामीनावर बाहेर आहे. गेल्या आठवड्यात सलमान खानने दुबईवारीसाठी परवानगी देण्यासंदर्भात मुंबई हायकोर्टात अर्ज केला होता. मंगळवारी न्या. शालिनी जोशी - फळसाणकर यांच्यासमोर या अर्जावर सुनावणी झाली. हायकोर्टाने सलमानला दुबईत जाण्याची परवानगी दिली आहे. मे अखेरीस सलमान खान दुबईत एका शोसाठी जाणार असून या शोसाठीच त्याने ही परवानगी मागितली होती.