सलमान खानला का आठवला छेदीसिंग

By Admin | Updated: January 18, 2017 13:25 IST2017-01-18T13:22:23+5:302017-01-18T13:25:02+5:30

दबंगमध्ये सोनू सूदने साकारलेला खलनायकही तितकाच तुल्यबळ होता. त्याने साकरलेला छेदीसिंग लोकांना आजही आठवतो.

Salman Khan's eighth ChhediSingh | सलमान खानला का आठवला छेदीसिंग

सलमान खानला का आठवला छेदीसिंग

tyle="text-align: justify;">ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 18 - 2010 मध्ये आलेल्या दबंग चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर तुफान यश मिळवले होते. सलमान खानने साकारलेल्या चुलबुल पांडेची भूमिका प्रेक्षकांना आवडली होती. दबंगमध्ये सोनू सूदने साकारलेला खलनायकही तितकाच तुल्यबळ होता. त्याने साकरलेला छेदीसिंग लोकांना आजही आठवतो. सलमान खानला पुन्हा सोनू सूद आठवण्याचे कारण म्हणजे सोनूचा चायनीज चित्रपट 'कुंग-फू-योगा'चा ट्रेलर नुकताच रिलीज झाला आहे. सलमान खानला ट्रेलर आवडल्याचे ट्विटरवरुन सांगितले आहे. 'कुंग-फू-योगा'मध्ये सोनूला अभिनय करण्यासाठी संधी दिल्याबद्दल सलमानने जॅकी चँगचे आभार मानले आहेत.
 
'कुंग-फू-योगा' चित्रपटात जॅकीसोबत अभिनेता सोनू सूद, दिशा पटनी आणि अमेयरा दस्तूरही झळकणार आहेत. हा चित्रपट 3 फ्रेबुवारी रोजी चित्रपटगृहात झळकणार आहे. बॉलिवूडमधील प्रसिद्ध कोरिओग्राफर फराह खान या चित्रपटासाठी एक खास ' आयटम नंबर' कोरिओग्राफ करणार असून आता जॅकी चॅन तिच्या तालावर नाचताना दिसणार आहे. या गाण्याचे चित्रीकरण फक्त भारतात नव्हे तर चीन आणि इर देशांमध्येही होणार आहे. या गाण्यात जॅकी कुर्ता, धोती आणि मोजडी या पारंपारिक भारतीय वेशातही दिसणार आहे. 
 
 

Web Title: Salman Khan's eighth ChhediSingh