सलमान खानचा कापला अहिल शर्माने पत्ता, अहिल बनणार बिग बॉसचा नवा होस्ट
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2017 10:07 IST2017-01-24T04:37:23+5:302017-01-24T10:07:23+5:30
बिग बॉसच्या गेल्या अनेक सिझनचे सूत्रसंचालन सलमान खान करत आहे. सलमानशिवाय या कार्यक्रमाचा कोण विचारही करू शकत नाही. पण ...
सलमान खानचा कापला अहिल शर्माने पत्ता, अहिल बनणार बिग बॉसचा नवा होस्ट
ब ग बॉसच्या गेल्या अनेक सिझनचे सूत्रसंचालन सलमान खान करत आहे. सलमानशिवाय या कार्यक्रमाचा कोण विचारही करू शकत नाही. पण सलमानचा आता पत्ता कापला जाणार असून सलमानची जागा नवीन होस्ट घेणार आहे आणि या होस्टला प्रशिक्षण दुसरे कोणी नाही तर सलमान खान स्वतः देत आहे.
हा नवा सूत्रसंचालक दुसरा कोणी नसून सलमानचा लाडका भाचा अहिल आहे. सलमानच्या बिग बॉस या कार्यक्रमाचे चित्रीकरण लोणावळा येथे दर आठवड्याला होते. त्यामुळे सलमानला खास भेट देण्यासाठी त्याची बहीण अर्पिता, तिचा नवरा आयुष आणि अहिल तिघेही बिग बॉसच्या सेटवर गेले होते.
अर्पिता, आयुष आणि अहिल लोणावळ्याला पोहोचले, तेव्हा सलमानचे चित्रीकरण सुरू होते. त्यामुळे ते तिघेही थेट सेटवर गेले. आपल्या मामाला त्या भव्य सेटवर पाहून अहिलला प्रचंड आनंद झाला. त्यावेळी जॅकलिन फर्नांडिस, करण जोहर आणि गणेश हेगडे सलमानसोबत चित्रीकरण करत होते. त्यांनाही या छोट्याशा अहिलला भेटून खूप आनंद झाला. त्यांनी सगळ्यांनी अहिलला उचलून घेतले आणि त्यांनी त्याच्यासोबत वेळदेखील घालवला. सलमान चित्रीकरण करत असताना तो बॅक स्टेज बसून सगळी मजामस्ती पाहात होता.
![salman khan ahil sharma]()
सलमानने अहिलला तुला बिग बॉस होस्ट करायला आवडेल का असेही विचारले. सलमानने अहिलच्या तोंडासमोर माइक धरला आणि त्याला तो बिग बॉसची ओपनिंग लाइनदेखील शिकवत होता. पण अहिलला मामा काय बोलतोय हे ऐकण्यापेक्षा त्याच्यासमोरील माइक अधिक आवडला होता. त्यामुळे तो त्या माइकसोबतच खेळत होता.
यावरून सलमान आतापासूनच आपल्या भाच्याला इंडस्ट्रीत आणण्यासाठी तयार करतोय असे म्हटले तर चुकीचे ठरणार नाही.