घराबाहेर गोळीबार झाल्यानंतर सलमानचा मोठा निर्णय; यापुढे घेणार नाही चाहत्यांची भेट?

By ऑनलाइन लोकमत | Published: April 16, 2024 11:23 AM2024-04-16T11:23:27+5:302024-04-16T11:23:46+5:30

Salman khan: सलमान गॅलक्सी अपार्टमेंटपासून महबूब स्टुडिओपर्यंत तो सायकल चालवत जातो. मात्र, आता तो सायकलिंगदेखील करणार नसल्याचं म्हटलं जात आहे.

salman-khan-no-more-cycling-for-dabang-actor-post-gun-firing-outside-house-galaxy-apartment | घराबाहेर गोळीबार झाल्यानंतर सलमानचा मोठा निर्णय; यापुढे घेणार नाही चाहत्यांची भेट?

घराबाहेर गोळीबार झाल्यानंतर सलमानचा मोठा निर्णय; यापुढे घेणार नाही चाहत्यांची भेट?

बॉलिवूड अभिनेता सलमान खान (salman khan) याच्या घरावर नुकताच गोळीबार करण्यात आला. त्यामुळे पुन्हा एकदा त्याच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. सलमानला पुन्हा एकदा कडक सुरक्षा देण्यात येत आहे. यामध्येच आता सलमान एक मोठा निर्णय घेण्याची शक्यता असल्याचं म्हटलं जात आहे. त्याच्या या निर्णयानुसार, आता त्याची आणि चाहत्यांची भेट कमी होणार आहे.

सलमान फिटनेस फ्रीक असल्याचं सगळ्यांनाच माहित आहे. त्यामुळे तो अनेकदा मुंबईतील वांद्रे भागात सायकल चालवतो. गॅलक्सी अपार्टमेंटपासून महबूब स्टुडिओपर्यंत तो सायकल चालवत जातो. मात्र, गेल्या काही दिवसांपासून त्याला सातत्यान धमकीचे फोन, मेसेज येत असल्यामुळे त्याचं सायकलिंग करणं वा एकट्याने बाहेर जाण्याचं प्रमाण कमी झालं होतं. यामध्ये आता त्याच्या घरावर गोळीबार झाल्यामुळे तो आता बाहेर सायकलिंग करणं पूर्णपणेच बंद करणार असल्याचं म्हटलं जात आहे.

एप्रिल २०२३ मध्ये सलमानला जीवे मारण्याची धमकी मिळाली होती. या धमकीनंतरही तो वांद्रे येथील रस्त्यावर सायकल चालवत होता. परंतु, यावेळी त्याच्यामागे पुढे सुरक्षारक्षकांच्या गाड्या होत्या. सलमानला रस्त्यावर सायकल चालवतांना पाहून एका चाहत्याने त्याचा व्हिडीओ काढायला सुरुवात केली. मात्र, लगेचच सलमानच्या बॉडीगार्डने या चाहत्याला व्हिडीओ काढण्यास मनाई केली. सलमानचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर पुन्हा चर्चेत आला आहे.

दरम्यान, आता सलमानच्या घरावर गोळीबार झाल्यामुळे त्याच्या सुरक्षेमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ करण्यात आली आहे. इतकंच नाही तर या घटनेमुळे आता सलमान बिनधास्तपणे चाहत्यांच्या भेटी घेणं वा सायकलिंग करणं बंद करु शकतो असं म्हटलं जात आहे.

Web Title: salman-khan-no-more-cycling-for-dabang-actor-post-gun-firing-outside-house-galaxy-apartment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.