'पठाण' सिनेमाच्या अ‍ॅक्शन सीक्वेंससाठी UAEला रवाना होणार सलमान खान

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2021 20:26 IST2021-02-03T18:30:00+5:302021-02-03T20:26:04+5:30

बॉलिवूडचा अभिनेता शाहरुख खान ‘पठाण’ सिनेमाचे शूटिंग सुरू केले आहे. 

Salman khan to leave for uae for action sequence of pathan film | 'पठाण' सिनेमाच्या अ‍ॅक्शन सीक्वेंससाठी UAEला रवाना होणार सलमान खान

'पठाण' सिनेमाच्या अ‍ॅक्शन सीक्वेंससाठी UAEला रवाना होणार सलमान खान

बॉलिवूडचा अभिनेता शाहरुख खान ‘पठाण’ सिनेमाचे शूटिंग सुरू केले आहे.  शाहरुख खान दुबईमध्ये चित्रपटाचे शूटिंग करतो आहे. त्याचबरोबर सलमान खान देखील लवकरच या चित्रपटाच्या अ‍ॅक्शन सीनसाठी दुबईला रवाना होणार आहे.

बुर्ज खलिफामध्ये सुरु आहे शूटिंग 
चित्रपटाचे चित्रीकरण जगातील सर्वात मोठी इमारत असलेल्या दुबईमध्ये बुर्ज खलिफामध्ये सुरु आहे. एबीपी न्यूजच्या रिपोर्टनुसार या चित्रपटात शाहरुखसोबत सलमान खान देखील दिसणार आहे.

सलमान एका खास भूमिकेत दिसणार आहे
 रिपोर्ट्सनुसार शाहरुख आणि सलमान दोघेही एकत्र १५ दिवस दुबईमध्ये शूटिंग करणार आहेत.  त्याचवेळी हे देखील सांगितले जात आहे की दोघे एकमेकांसोबत काम करण्यात खूप आनंदित आहेत.  पठाण या चित्रपटात सलमान एका खास भूमिकेत दिसणार आहे, ज्याची भूमिका डिटेक्टिव्ह टायगरची असणार आहे.

दीपिका पादुकोण शाहरूख खानच्या बरोबर असेल
या व्यतिरिक्त दीपिका पादुकोण या चित्रपटात शाहरुख खानसोबत मुख्य भूमिका साकारताना दिसणार आहे.  त्याचबरोबर या चित्रपटात जॉन अब्राहम देखील मुख्य भूमिकेत दिसणार आहे.  या चित्रपटाचे वेळापत्रक जवळपास ५० दिवस आहे.  त्याचबरोबर बॉलिवूडच्या सूत्रांच्या माहितीनुसार हा चित्रपट  २०२१ च्या शेवटच्या महिन्यांत प्रदर्शित होऊ शकतो.

Web Title: Salman khan to leave for uae for action sequence of pathan film