"आम्ही सलमान खानला सोडणार नाही, खूप वाईट होईल; लास्ट वॉर्निंग देतोय..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2024 14:01 IST2024-10-29T14:01:02+5:302024-10-29T14:01:37+5:30
Salman Khan : बॉलिवूड सुपरस्टार सलमान खानला आणखी एक धमकी देण्यात आली आहे.

"आम्ही सलमान खानला सोडणार नाही, खूप वाईट होईल; लास्ट वॉर्निंग देतोय..."
बॉलिवूड सुपरस्टार सलमान खानला आणखी एक धमकी देण्यात आली आहे. मोहम्मद तैयब नावाच्या व्यक्तीने मुंबई कंट्रोल रूम नंबरवर टेक्स्ट मेसेज पाठवला आणि म्हटलं की, "आम्ही सलमान खानला सोडणार नाही. खूप वाईट होईल. लास्ट वॉर्निंग देत आहोत." याप्रकरणी आरोपीलाही अटक करण्यात आली आहे.
नोएडा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मोहम्मद तैयब असं आरोपीचं नाव असून त्याचं वय १८ वर्षे आहे. आरोपी हा बरेलीचा रहिवासी आहे, पण दिल्लीतील कर्दमपुरी येथे तो त्याच्या मामाच्या घरी राहतो आणि कारपेंटरचं काम करतो. मोहम्मद तैयबच्या वडिलांचं नाव मोहम्मद ताहिर आहे.
धमकीचा मेसेज आपण गंमतीने पाठवला असल्याचे आरोपीने चौकशीदरम्यान सांगितलं. याआधी सलमान खान आणि झिशान सिद्दिकी यांना धमकावण्याचे आणखी एक प्रकरण समोर आले होते, ज्यामध्ये गुरफान खान नावाच्या तरुणाने बाबा सिद्दिकी यांचा मुलगा झिशान सिद्दिकी आणि सलमान खान यांना धमकी दिल्याचं समोर आलं आहे.
झिशान सिद्दिकी यांच्या जनसंपर्क कार्यालयातील फोनवर हा धमकीचा फोन आला. फोनवर त्या व्यक्तीने झिशान सिद्दिकी आणि अभिनेता सलमान खान यांना जीवे मारण्याची धमकी दिली होती. त्यानंतर निर्मलनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने गुफरान खानला नोएडा येथून अटक केली.