सलमान खान विनोद खन्नांना मानायचा "लकी"
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2017 16:02 IST2017-04-27T16:02:30+5:302017-04-27T16:02:55+5:30
बॉलिवूडचा दबंग सलमान खान ज्येष्ठ अभिनेते विनोद खन्ना यांना स्वतःसाठी लकी मानायचा. कारण

सलमान खान विनोद खन्नांना मानायचा "लकी"
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 27 - बॉलिवूडचा दबंग सलमान खान ज्येष्ठ अभिनेते विनोद खन्ना यांना स्वतःसाठी लकी मानायचा. आगामी सिनेमा "दबंग 3"मध्येही सलमान विनोद खन्ना यांच्यासोबत काम करण्यास उत्सुक होता. सलमान खानसोबत कोणताही सिनेमा करताना विनोद खन्ना आपले सर्वस्व पणाला लावून काम करायचे.
सलमान खान आणि विनोद खन्ना यांनी अनेक सिनेमांमध्ये काम केले आहे. "निश्चय", "वॉन्टेंड", "दबंग", "दबंग 2" आणि "टेल मी ओ खुदा", यांसारखे सिनेमांमधील सलमान खान आणि विनोद खन्ना यांची जोडी सिनेरसिकांच्या कायम आठवणी राहील यात काही शंका नाही.
"दबंग" आणि "दबंग 2" सिनेमांनंतर अरबाज खानला आगामी दबंग 3 सिनेमात विनोद खन्नांसोबत काम करायचे होते. मात्र विनोद यांच्या निधनामुळे आता अरबाजला सिनेमासाठी नवीन चेहरा शोधावा लागणार आहे.
विनोद खन्ना यांचे निधन
बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते विनोद खन्ना यांचे गुरुवारी निधन झाले. वयाच्या 70व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांचे पार्थिव निवासस्थानी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. प्रकृती अस्वास्थ्यामुळे विनोद खन्ना यांच्यावर मुंबईतील खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. आरोग्य तपासणीदरम्यान त्यांना कॅन्सर असल्याचे निदान झाले होते.
काही दिवसांपूर्वी शरीरातील पाणी कमी झाल्याच्या कारणामुळे त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. यावेळी गिरगावातील एचएन रिलायन्स फाउंडेशन अँड रिसर्च सेंटरमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होते. यादरम्यान, त्यांचा हॉस्पिटलमधील फोटो सोशल मीडियावर प्रचंड प्रमाणात व्हायरल झाला होता. यात फोटोमध्ये विनोद खन्ना त्यांना ओळखणंही कठीण झाले होते. आरोग्य तपासणीदरम्यान त्यांना मूत्रपिंडाचा कॅन्सर असल्याचे निष्पन्न झाले होते.
विनोद खन्ना यांनी "मेरे अपने", "कुर्बानी", "पूरब और पश्चिम", "रेशमा और शेरा", "हाथ की सफाई", "हेरा फेरी", "मुकद्दर का सिकंदर" यांसारखे अनेक शानदार सिनेमे इंडस्ट्रीला दिले आहेत. सुरुवातीच्या काळात त्यांनी खलनायकाच्या भूमिका केल्या मात्र यानंतर त्यांना मुख्य नायकाचे सिनेमे मिळत गेले.
विनोद खन्ना यांनी 1968मध्ये "मन का मीत" या सिनेमाद्वारे बॉलिवूडमध्ये एन्ट्री केली होती. तर शाहरुख खान आणि वरुण धवन यांच्यासोबत "दिलवाले" या सिनेमात ते शेवटचे दिसले होते.