सलमान बनला मामा, अर्पिता-आयुषला झाला 'मुलगा'
By Admin | Updated: March 30, 2016 14:36 IST2016-03-30T14:25:20+5:302016-03-30T14:36:36+5:30
अभिनेता सलमान खान पुन्हा एकदा 'मामा' बनला असून त्याची लहान बहीण अर्पिता खान व आयुश शर्मा यांना एक गोड 'मुलगा' झाला आहे

सलमान बनला मामा, अर्पिता-आयुषला झाला 'मुलगा'
>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि, ३० - अभिनेता सलमान खान पुन्हा एकदा 'मामा' बनला असून त्याची लहान बहीण अर्पिता खान व आयुश शर्मा यांना एक गोड 'मुलगा' झाला आहे. अर्पिताचा नवरा आषुषने सोशल नेटवर्किंग साईटवरून ही बातमी शेअर केली असून 'अहिल' असे त्याचे नाव ठेवण्यात आले आहे.
' आमची प्रतिक्षा संपली असून आमचा छोटा राजकुमार अहिलचे आगमन झाले आहे' अशी कॅप्शन देत आयुष शर्माने सोशल नेटवर्किंग साईट्सवर ही बातमी शेअर केली. बाळ आणि आई दोघांची प्रकृती उत्तम असल्याची माहिती आहे.
गेल्या काही दिवसांपासून मलायका आणि अरबाज यांच्यातील तसेच सोहेल खान व त्याच्या पत्नीच्या दुराव्याच्या वृत्तांमुळे मुळे खान कुटुंबियांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. मात्र आज अर्पिताच्या मुलाच्या रुपाने नवा पाहुणा आल्यामुळे खान कुटुंबाता आनंदाचे वातावरण आहे.
अर्पिता व आयुष यांचा दोन वर्षांपूर्वी धुमधडाक्यात विवाह झाला होता.